Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

पुण्यातील सदाशिव पेठेतील ‘रमेश डाईंग’ दालनात आग

अग्निशमकच्या तत्परतेमुळे गंभीर दुर्घटना टळली

marathinews24.com

पुणे – शहरातील सदाशिव पेठेतील रमेश डाईंग वस्त्र दालनाच्या गोदामात आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. वस्त्रदालनाची इमारत तीन मजली असून, इमारतीतील छतावर गोदाम आहे. गोदामात ठेवलेले स्वेटर, रेनकोट, छत्री, दफ्तर, तसेच विविध वस्तू पेटल्याने मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने घबराट उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

पुण्यातून ‘सर्व्हायकल कॅन्सर मुक्त महाराष्ट्र’ मोहिमेची सुरूवात – सविस्तर बातमी

शनिपाराजवळ रमेश डाईंग हे प्रसिद्ध दालन आहे. स्वेटर, रेनकोट, छत्र्या, दफ्तरे अशा वस्तूंची विक्री केली जाते. तीन मजली इमारतीत हे वस्त्रदालन आहे. दुकानाच्या छतावर पत्र्याचे शेड आहे. तेथे सौरउर्जेचे पॅनेल बसविण्यात आले आहेत. दुपारी बाराच्या सुमारास छतावर असलेल्या गोदामात आग लागली. काही क्षणात कपड्यांनी पेट घेतला आणि धुराचे लोट परिसरात पसरले. आग लागल्यचाी माहिती मिळताच परिसरात घबराट उडाली. मोठ्या प्रमाणावर धूर झाल्याने परिसरातील नागरिक बाहेर आले. शनिपार परिसरात मोठी गर्दी झाली. गर्दीतून वाट काढत अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले. कपड्यांनी पेट घेतल्याने धूर झाला होता. सुरक्षेचा उपाय म्हणून अग्निशमन दलाच्या जवानांनी ‘बीए सेट’ (श्वसन उपकरण) यंत्रणा परिधान करुन आत प्रवेश केला. जवानांनी आगीत कोणी अडकले का नाही, याची पाहणी केली. दालनातील कर्मचारी बाहेर पडले होते. आग छतावर लागली होती. त्यामुळे जवानांनी शहा ब्रदर्स या दुकानातील पत्रे काढून पाण्याचा मारा सुरू केला.

छतावर लागलेली आग दुकानात पसरणार नाही, याची काळजी घेऊन जवानांनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.
आगीत स्वेटर, रेनकोट, दफ्तर, सॅक, तसेच अन्य साहित्य भस्मसात झाले. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. अग्निशमन दलाच्या मुख्य केंद्रासह, कसबा, जनता वसाहत, एरंडवणे येथील केंद्रातील बंब, टँकर, तसेच उंच शिडीचे वाहन मदतकार्यात सहभागी झाले होते. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, अग्निशमन अधिकारी विजय भिलारे, पंकज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ५० जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. स्थानिक नागरिक, पोलीस, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आग

आग लागल्यानंतर शनिपार परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती. आग लागल्यानंतर अरुंद रस्त्याने अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. शनिपार ते निंबाळकर तालीम चौक परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद करण्यात आले. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यत आल्याने तासभर वाहतूक विस्कळीत झाले. वाहतूक पोलिसांनी या भागातील वाहतूक सुरळीत केली.

शनिपार परिसरात दाटवस्ती आहे, तसेच अनेक दुकाने या भागात आहेत. आग लागल्यानंतर मोठा धूर झाला होता. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. – देवेंद्र पोटफोडे, मुख्य अग्निशमन अधिकारी

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×