Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात चारठिकाणी फ्लॅट फोडले, ८ लाखांचा ऐवज चोरला

सिंहगड रस्ता भागात भरदिवसा घरफोडी

शहरातील विविध भागात चोरट्याचां धुडगूस सुरूच

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात चोरट्यांनी धुडगूस घातला असून, फ्लॅटचे कुलूप तोडून चोर्‍या केल्या जात आहेत. चोरट्यांनी खडक, विश्रामबाग, सहकारनगर, विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत बंद फ्लॅटचे कुलूप तोडून पावणे आठ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. प्रामुख्याने नवी पेठ, रविवार पेठेत भरदुपारी घरे फोडली आहेत.

वैमनस्यातून दोघांवर शस्त्राने वार – सविस्तर बातमी 

चोरट्यांनी नवी पेठेत दिवसा घरफोडी करून दीड लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार नवी पेठेतील सुशीला अपार्टमेंटमध्ये राहण्यास आहेत. रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास त्या घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आतप्रवेश केला. कपाटातून रोकड तसेच सोन्याचे दागिने असा दीड लाखांचा ऐवज चोरून पोबारा केला.

चोरट्यांनी रविवार पेठेत बंदिवान मारूती मंदिराजवळ घरफोडी केली आहे. याप्रकरणी खडक पोलिसांत ३५ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. तक्रारदार हे दुपारी बाराच्या सुमारास घराबाहेर गेले होते, तेव्हा चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून आतप्रवेश करत १ लाख ३ हजार रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. दोन्ही घटना भरदुपारी घडल्या असून, चोरटे पसार झाले आहेत. अधिक तपास पोलिस करत आहेत.

नातुबाग बस स्टॉपजवळील इंद्रलोक सोसायटीतील फ्लॅटमध्ये चोरट्यांनी चोरी केली आहे. तब्बल ४ लाख ४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार शनिवारी सकाळी बाहेर गेले होते. ते दुसर्‍या दिवशी सकाळी घरी परतले, तेव्हा त्यांना घराचे कुलूप उचकटल्याचे दिसून आले. त्यांनी आत जाऊन पाहिले असता घरातील कपाटातून दागिने व रोकड चोरून नेल्याचे दिसून आले. तसेच विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी बंद फ्लॅटमध्ये चोरी करून १ लाख ३३ हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलिसांनी व्यंकटेश वसंत करंडे (वय ३४) याला अटक केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×