नऊ जणांवर गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – Forced Conversion Case : धर्मांतरासाठी तृतीय पंथीयावर दबाव आणून त्याला मारहाण करण्यात आल्याची घटना कोथरूड भागात घडली. तृतीय पंथीयाला धमकावून त्याच्या घरातील ६ लाख ७० हजार रुपयांची रोकड लुटण्यात आली. या प्रकरणी ९ जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी हे तृतीय पंथीय आहेत. याबाबत एका तृतीय पंथीयाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, नऊ तृतीय पंथीयांविरुद्ध दरोडा, धमकाविणे, तसेच महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियमन २०२६ मधील कलमे, तसेच तृतीय पंथीय व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) अधिनियम २०१९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोग्य जनजागृती व समुपदेशन शिबिर – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३० वर्षीय तृतीय पंथीय हा कोथरूडमधील रामबाग काॅलनी परिसरातील एका मंदिराजवळ राहायला आहे. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या आरोपी गुन्हा दाखल करण्यात आलेले नऊ तृतीयपंथीय हे त्याच्या घरात शिरले. Forced Conversion Case त्यांनी हिंदू धर्माविषयी अपमानास्पद वक्तव्य केले. ‘ तू धर्म सोडून दुसऱ्या धर्माचा स्वीकार कर’, अशी धमकी दिली. फिर्यादी तृतीय पंथीयाला पट्टा, बांबूने मारहाण केली. भिक्षेतील ५० टक्के वाटा न दिल्यास जीवे मारु, अशी धमकी दिली. आराेपी तृतीयपंथीयांनी त्याला धमकावून घरातील सहा लाख ७० हजारांची रोकड लुटली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस निरीक्षक अनिल माने यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम तपास करत आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी तृतीयपंथीय हे गणेश पेठेत राहायला आहेत.
धर्मांतरासाठी दबाब आणण्याचे प्रकार रोखण्यासाठी नवीन कायद्याची निर्मिती नुकतीच करण्यात आली. या कायद्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. पुणे शहर परिसरात धर्मांतरसाठी दबाब आणल्या प्रकरणी आतापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले आहेत. धर्मांतरासाठी दबाब आणणल्या प्रकरणी एका धर्मगुरुविरुद्ध खडक पोलीस ठाणे, तसेच एका तरुणाविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.






















