Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

जेसीबी फसवणूक प्रकरणात चौथ्या रिकव्हरी एजंटला अटक

जेसीबी फसवणूक प्रकरणात चौथ्या रिकव्हरी एजंटला अटक

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण 

marathinews24.com

पिंपरी : महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात हगवणे आई आणि मुलाच्या विरोधात दाखल असलेल्या जेसीबी फसवणूक प्रकरणात पोलिसांनी चौथ्या रिकव्हरी एजंटला अटक केली आहे. या एजंटने जेसीबी मशीन ताब्यात घेऊन शशांक हगवणे याला सोपविण्याची ३० हजार रुपये घेतल्याचे समोर आले आहे.

मावळ, शिरुरमधील युवा सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या – सविस्तर बातमी 

प्रणय तुकाराम साठे (२७, कोथरूड) असे अटक केलेल्या चौथ्या रिकव्हरी एजंटचे नाव आहे. यापूर्वी योगेश रासकर (२५), वैभव मोहन पिंगळे (२७, तळेगाव ढमढेरे) आणि गणेश रमेश पोतले (३०, मोहितेवाडी) या तीन रिकव्हरी एजंटना अटक करण्यात आली आहे.

वैष्णवी हगवणे मृत्यु प्रकरणातील आरोपी पती शशांक राजेंद्र हगवणे आणि सासू लता राजेंद्र हगवणे (दोघे रा. भुकूम, ता. मुळशी) या माय-लेका विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. लता हगवणे हिच्या नावावर असलेले जेसीबी मशीन प्रशांत येळवंडे यांनी खरेदी करण्याचा व्यवहार ठरला. जेसीबीच्या बँक कर्जाच्या हप्त्याची दरमहा ५० हजारांची रक्कम येळवंडे हे शशांकला देत होते.

मात्र, त्याने हप्ते न भरता रिकव्हरी एजंटला हाताशी धरून जेसीबी मशीन येळवंडे यांच्याकडून काढून स्वत:च्या ताब्यात घेतले. बँकेने जेसीबी मशीन जप्त करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितल्यानंतरही जेसीबी जप्त करून शशांक हगवणे याच्या ताब्यात देणार्‍या तिघा रिकव्हरी एजंटांना महाळूंगे एमआयडीसी पोलीसांनी गुरूवारी अटक केली.

या एजंटकडे तपास करताना आणखी एका रिकव्हरी एजंटचे नाव समोर आले. शशांकचा मित्र रिकव्हरी एजंट प्रणय साठे याने इतर तीन रिकव्हरी एजंट आणि शशांक यांच्यात मध्यस्थी केली. या मांडवलीसाठी प्रणय याने शशांक याच्याकडून ३० हजार रुपये ऑनलाईन स्वरूपात घेतले. ती रक्कम त्याने गणेश पोतले याला दिली. त्यामुळे पोलिसांनी प्रणय याला शुक्रवारी अटक केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×