पाणी प्लॉन्टच्या नावाखाली २ कोटी ३४ लाखांची फसवणूक

बाप-लेकांविरूद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा

marathinews24.com

पुणे – पाणी प्लॉन्टमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याची बतावणी करीत बाप-लेकांनी पेट्रोल पंप व्यावसायिकाला तब्बल २ कोटी ३४ लाखांचा गंडा घातला आहे. ही घटना १ डिसेंबर २०२४ ते १९ मार्च २०२६ कालावधीत कदमवाक वस्ती लोणी काळभोरमध्ये घडली आहे. याप्रकरणी तिघांविरूद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रतीक राजेश काबरा, रोहित राजेश काबरा, राजेश सत्यनारायण काबरा (तिघेही रा. त्रिवेणीनगर, हडपसर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आनंद लाहोटी (रा. हांडेवाडी रोड, हडपसर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पुण्यात सायबर चोरट्यांकडून फसवणूकीचे सत्र कायम – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार लाहोटी पेट्रोल पंप व्यावसायिक असून, हडपसरमध्ये राहायला आहेत. आरोपी काबरा हे त्यांचे नातलग असून त्यांचा द रूबाबदार नावाने कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. तसेच पॅकेजिंक पाणी बॉटल विक्रीचाही ते व्यवसाय करतात. आरोपी काबरा यांनी लाहोटी यांना पाण्याच्या व्यवसाय करा, त्यामध्ये चांगला नफा मिळतो, असे सांगून भागीदारी करण्यास भाग पाडले. त्यानुसार १७ फेबु्रवारी २०२५ मध्ये त्यांच्यात ए. पी. बेव्हरेजेस नावाने भागीदारी करार झाला. त्यानंतर आरोपींनी पाणी बॉटल निर्मिती व्यवसायासाठी लाहोटी यांच्याकडून वेळोवेळी रक्कम वर्ग करून घेतली. त्यांच्याकडून पाणी प्लॅन्टमध्ये १ कोटी ७८ लाख ७५ हजारांची गुंतवणूक करून घेतली. त्यानंतर आरोपींनी जुन ते ऑक्टोबर २०२५ कालावधीत विक्री झालेल्या पाणी बॉटल व्यवहारातील ५५ लाख ४८ हजार रूपये स्वतःच्या बँकखात्यात वर्ग केले.

आरोपींनी लोणी काळभोरमधील कदमवाकवस्तीवर नव्याने उभारलेल्या प्लॉन्टमधील मशीन्स तक्रारदार लाहोटी यांच्या परवानगीशिवाय विक्री केल्या. दोघा भावंडासह त्यांच्या वडिलांनी डिसेंबर २०२४ मार्च २०२५ कालावधीत तक्रारदार लाहोटी यांची मिळून २ कोटी ३४ लाख २३ हजार रूपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी संबंधितांविरूद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×