Breking News
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

मोक्का कारवाईनंतर ८ महिने फरारी आरोपीला बेड्या

मोक्का कारवाईनंतर ८ महिने फरारीला बेड्या

गुन्हे शाखेच्या युनिट तीनने केले जेरबंद

marathinews24.com

पुणे– पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तिघांना बेदम मारहाण करीत त्यांचा खूनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी संबंधित टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे कारवाई झाल्यानंतर ८ महिन्यांपासून फरार असलेल्या टोळीतील आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पथकाने जेरबंद केले आहे. रोहन राजेश धिवार (वय २२, रा. वडगाव धायरी) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे.

दहशत माजवणार्‍या आकाश थोरात टोळीवर मोक्का – सविस्तर बातमी 

पूर्ववैमनस्यातून कर्वेनगरातील चंद्रलोक बियर बारच्या बाहेर रवी जाधव, यश घोलप, बारक्या लोणारेसह त्यांच्या १४ ते १५ साथीदारांनी प्रतिक भोकरे, रोहित रहाटे, नितीन जमादार यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयता, अ‍ॅल्युमिनियम पाईप, पेव्हिंग ब्लॉकने बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली होती. पोलिसांनी या गुन्ह्यातील अनेकांना अटक केली.

टोळीची कर्वेनगरमध्ये दहशत असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर मोका कारवाई केली होती. टोळीतील रोहन धिवार तेव्हापासून फरार होता. दरम्यान आरोपी रोहन धिवार स्वारगेट बसस्थानकावर आल्याची माहिती पोलीस अंमलदार अमित बोडरे व चेतन शिरोळकर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने स्वारगेट बसस्थानकातून त्याला ताब्यात घेत अटक केली. चौकशीत रोहन धिवार याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, परि पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील हंस, सुरेश पाटील, पोलीस अंमलदार पंढरीनाथ शिंदे, अमित बोडरे, किशोर दुशिंग, चेतन शिरोळकर, अक्षय गायकवाड, अर्चना वाघमारे, भाग्यश्री वाघमारे, सुजीत पवार यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×