Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

ट्रक चालकाची लुटमार करणार्‍या टोळीला अटक

पुण्यात मोबाईल चोरणार्‍याला अटक, ३५ मोबाईल जप्त

मगरपट्टा हडपसर परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – ट्रक चालकाकडून अपघात घडलेला नसतानाही त्याला अडवून मारहाण करीत ५ हजारांची लुट करणार्‍या टोळीला हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना २४ नोव्हेंबरला रात्री साडेबाराच्या सुमारास हडपसर परिसरातील मगरपट्टा रस्त्यावर घडली आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून उपनगर परिसरातून जाणार्‍या महामार्गालगत अशारितीने अवजड वाहन चालकांची लुट होत असल्याचे वारंवार घडणार्‍या घटनांवरून स्पष्ट झाले आहे.

बीव्हीजी ग्रुपने दिली जीवे मारण्याची धमकी – सविस्तर बातमी

इरफान इस्माईल सय्यद (वय ३३ रा. कामठे वस्ती, हडपसर) शाहरूख आसिफ मणियार (वय ३३ रा. सय्यदनगर, हडपसर) शुभम विजयशंकर तिवारी ५वय २७ रा. हिंगणेमळा, हडपसर) यांनी अटक केली आहे. त्यांचे तीन साथीदार पसार झाले असून, पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर आहे. तुळजापूर परिसरातील ट्रक चालकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे तुळजापूरमधील सलगरा दिवटी गावचे रहिवाशी असून, ते ट्रक चालक आहेत. २४ नोव्हेंबरला रात्री साडेबाराच्या सुमारास ते मगरपट्टा रोड परिसरात ट्रक घेउन आले होते. त्यावेळी टोळक्याने त्यांना अडविले. अपघात झाल्याचा बनाव करीत मारहाण करीत लुटमार केली. तक्रारदाराच्या खिशातून पाच हजारांची रोकड काढून नेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच हडपसर पोलिसांनी तत्काळ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×