Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

ज्येष्ठ महिलेला मारहाण करून दागिने लुटणारा गजाआड

ज्येष्ठ महिलेला मारहाण करून दागिने लुटणारा गजाआड

सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – ज्येष्ठ महिलेला मारहाण करुन दागिने लुटणाऱ्या चोरट्याला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली. वडगाव बुद्रुकमधील महापालिका वसाहतीत ही घटना घडली. याप्रकरणी ऋग्वेद चंद्रकांत भिसे (वय २४, रा. पीएमसी काॅलनी, वडगाव बुद्रुक) याला अटक करण्यात आली. याबाबत ज्येष्ठ महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

किरकोळ वादातून शेजाऱ्याचा खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६५ वर्षीय ज्येष्ठ महिला वडगाव बुद्रुकमधील महाालिका वसाहतीत राहायला आहेत. आरोपी भिसे वसाहतीत राहायला आहे. ६ जानेवारी रोजी ज्येष्ठ महिलेच्या घरात कोणी नव्हते. सायंकाळी पाचच्या सुमारास भिसे महिलेच्या घरात शिरला. त्याने ज्येष्ठ महिलेला मारहाण केली. गळ्यातील सोन्याची पोत आणि कर्णफुले असा एक लाख ७० हजार रुपयांचा ऐवज त्याने काढून घेतला. त्यानंतर तो पसार झाला. ज्येष्ठ महिलेने याबाबत तक्रार दिली. त्यानंतर पसार झालेल्या भिसे याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक काजळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×