Breking News
Sahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Gopichand Padalkar : सांगली जिल्हा बँक निवडणुकीत गोपीचंद पडळकरांचा दणदणीत विजय; प्रस्थापितांचा केला करेक्ट कार्यक्रम

Gopichand Padalkar Sangli Bank Election

जत सोसायटी गटातून ४५ मतांचा कोटा पूर्ण करत प्रस्थापितांना धक्का देत मिळवला विजय

marathinews24.com

सांगली – सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC) निवडणुकीत ६ जागांची मतमोजणी प्रक्रिया आज पार पडली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत १५ जागा बिनविरोध झाल्यानंतर उरलेल्या सहा जागांसाठी १३ उमेदवार मैदानात होते. जत सोसायटी गटातून आमदार गोपीचंद पडळकर यांना ८८ पैकी ५४ तर विनोद पवार यांना ३४ मत मिळाली त्यामुळे गोपीचंद पडळकर यांचा २० मतांनी विजय झाला आहे. (Gopichand Padalkar Sangli Bank Election) सांगली जिल्हा बँकेच्या मतमोजणी केंद्राच्या परिसरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांकडून गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करण्यात आला आहे. विजयाची घोषणा होण्याआधीच सांगली आणि मिरज मध्ये बॅनर लावण्यात आले होते. गोपीचंद पडळकर यांचा विजय घोषित करण्यापूर्वीच समर्थकांची जल्लोषही सुरू केला होता.

मेट्रो-3 वरील पहिल्या प्रवासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विद्यार्थिनी, आयटीएन्सशी संवाद; नव्या मार्गावर पहिले तिकीट घेऊन केला प्रवास – सविस्तर बातमी 

विजयानंतर पडळकर म्हणाले, दुष्काळाचे कारण देऊन अनेक जागा बिनविरोध करण्याचा डाव केला, मात्र दुष्काळी तालुक्यातच निवडणूक लावली असे म्हणाले, ज्या विश्वासाने मला निवडून दिले आहे त्याच ताकदीने शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही उभे राहणार आहे. करेक्ट कार्यक्रम करणाऱ्यांचा आम्ही त्यांना टप्प्यात आणून कार्यक्रम केलाय. जतच्या जनतेने सुद्धा त्यांचा कार्यक्रम केलाय. जे चांगले काम आहे, त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू. चुकीचे आहे त्याला आम्ही विरोध करू. माझ्या निकालाने आता जिल्हा बँकेचे गणित पूर्ण बदलले आहे. त्यांचे बँकेवरील वर्चस्व संपुष्टात आणले आहे, असंही पडळकरांनी म्हटलं आहे.

जत अ गटातील जे मतदार होते त्या सर्व मतदारांच मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. माझ्या या निवडणुकीमध्ये समोरच्या पार्टीचे जे जिल्ह्याचे प्रमुख आहेत, ते वारंवार नवीन नवीन नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामध्ये पहिला नॅरेटिव्ह असा होता की, जो कोणी जतचा आमदार आहे, तो जिल्हा बँकेला उभा राहिला तर तो पडतो, आणि तो जिल्हा बँकेला पडला की पुढे विधानसभेला पण पडतो, हा जतचा इतिहास आहे. त्यामुळे ते सातत्याने म्हणत होते की हा आमदार उभा राहिला याला जतची लोकं पाडणार. परंतु जतची लोकं इतकी हुशार आणि क्रांतिकारी आहेत की, त्यांनी हा इतिहास पूर्वीचा होता, तो इतिहास मोडीत काढला आणि नवीन इतिहास निर्माण केलेला आहे.

अर्ज बाद करण्यासाठी विरोधक सहा वेळा कोर्टात गेले

जिल्ह्यामध्ये एक हाती जिल्हा बँक ताब्यात ठेवायची आणि लोकांना ब्लॅकमेल करायचं, लोकांना नागवायचं त्यांच्या संस्था मोडीत काढायच्या मोडीत काढल्यावर विकत घ्यायच्या कवडीमोल दरानं. हे जे गेल्या १०-१५ वर्षांपासून चालू होतं त्याला आता खीळ बसणार आहे आणि सभासदांच्या हिताचच निर्णय हे जिल्हा बँकेमध्ये होतील अशा पद्धतीचं काम आम्ही सगळे हे समविचारी लोकं आम्ही त्या बँकेमध्ये करणार आहे. बघा माझ्या या माझ्या या निवडणुकीमध्ये सहा वेळा हे कोर्टात गेलेत. पहिल्यांदा जेव्हा कच्ची यादी लागली तेव्हा डीडीआर साहेबांच्या हे गेले. परत लगेच जॉईन रजिस्टर साहेबांकडे गेले. तिथून झाल्यानंतर लगेच सर्किट बेंच कोल्हापूरला गेले. सर्किट बेंच असं म्हणले की अजून ते निवडणुकीला उभाच राहिले नाहीत, ते फक्त मतदार यादीत आहेत त्यांनी ती रद्द करून टाकली. परत लगेच अर्ज छाननीमध्ये पात्र झाल्याच्यानंतर डीडीआर साहेबांच्याकडे तिथे तक्रार झाली. परत ते सर्किट बेंचकडे गेले. तिथे निर्णय आमच्या विरोधात गेला. परत सुप्रीम कोर्ट म्हणजे सहा वेळा कोर्टाच्या पायऱ्या आम्हाला या प्रकरणात चढाव्या लागलेल्या आहेत.

वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना त्यांनी चुकीच्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु लोकांनी ऐकलं नाहीये. आणि त्यामुळे 20 वर्षे मी राजकारणात येऊन मला जिल्हा बँकेचं राजकारण कळालंच नव्हतं, परंतु जतच्या लोकांनी मला डायरेक्टर म्हणून निवडून दिलं आहे, त्यामुळे आता लेट जरी झालो तरी आता आम्ही थेट आहोत आणि व्यवस्थितपणे तिथे आम्ही कामकाज करू, आम्ही चुकीचं काहीच होऊ देणार नाही. जिथं कुठे चांगली कारखानदारी आहे त्यांना मदत लागणार आम्ही पाठबळ देऊ. पण खोटं जे करतायेत त्यांना अजिबात पाठबळ नाही आणि ते लोकांच्या समोर आम्हाला आणायचं आहे. कारण ही बँक लोकांची आहे ना, ही काय मूठभर पुढार्‍यांची बँक नाही, आम्ही आता डायरेक्टर झालो म्हणून ही काय आमच्या बापाची बँक नाही. ही शेतकऱ्यांची बँक आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, गरीब लोकांना झाला पाहिजे हीच आमची भावना आहे.

बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी कर्ज देण्याचा प्रयत्न करणार 

Gopichand Padalkar Sangli Bank Election जिल्ह्यातली कुणाचीही फाईल राजकारणासाठी पेंडिंग राहणार नाही. तो जरी आमच्या पार्टीचा नसला, परंतु तो शेतकरी सभासद आहे आणि त्यांना या जिल्हा बँकेची मदत पाहिजे मदत मिळेल. जिल्ह्यातली तरुण मुलं जी होतकरू आहेत, बेरोजगार आहेत आणि त्यांना उद्योग निर्माण करायचा आहे. आणि एका कारखान्याला ५०० कोटी देण्यापेक्षा ५००० पोरांना १०-१० लाख रुपये देऊन आपण ५००० पोरं उभा राहतील. कारखानदारांना काय नॅशनल बँका पण देऊ शकतात. कारखान्यांना अन्य कोऑपरेटिव्ह बँका पण कर्ज देऊ शकतात. कारखान्यांना कर्ज देण्याच्या मी विरोधात नाही, परंतु कर्ज घेणं बुडवणं, परत लिलाव काढणं, परत बँकेचं नुकसान करणं, याच्या विरोधात मी आहे. आणि त्यामुळं सभासद शेतकरी आणि त्यांची पोरं. सभासद शेतकरी त्यांच्या शेतात काम करणारी जी भूमिहीन लोक आहेत, त्यांची पोरं यांच्यासाठी पॉलिसी बँकेत आली पाहिजे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार असेही पडळकर म्हणाले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×