Breking News
ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून एक लाखांचे दागिने चोरीलाजिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण विभागाच्या विविध कामकाज आढावा बैठका संपन्नडीजे, लेझरमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श ‘पुणे पॅटर्न’ निर्माण व्हावाशिक्षणाच्या बळावर भटके-विमुक्त समाजाने प्रगतीची नवी ओळख निर्माण करावीशाश्वत विकासाची उद्दिष्टपूर्ती वेगाने करण्यासाठी विभागांनी अभिसरणातून काम करावेपुण्यात ‘भटके-विमुक्त दिवस’ निमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्नपीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एकाचा मृत्यूमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यमेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतपुणेकर ग्राहकांसाठी भांडारकर रस्त्यावर सुरु झाले ‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’चे दालन

गुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्त

गुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्त

पोलिसांनी केली दोघांना अटक

marathinews24.com

पुणे – गुजरातमधून खाजगी ट्रॅव्हलद्वारे प्रतिबंधक गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांचा नऱ्हे पोलिसांनी पर्दागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तफाश केला आहे. विक्रीसाठी आणलेला तब्बल २२ लाख ९१ हजार ५३४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विलास घुले हत्या प्रकरण पेटले; ६ आरोपी पकडले – सविस्तर बातमी 

नऱ्हे पोलीस ठाण्याचे तपास पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार देवा चव्हाण यांना ट्रॅव्हल्स बसमधून प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी वाहतूक केला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे व त्यांच्या पथकाने नवले ब्रिज परिसरात सापळा रचला. तपासणीदरम्यान ट्रॅव्हल्स बसचा चालक हबास मुबारक खान (वय ३४, रा. बाडमेर, राजस्थान) याच्या ताब्यातून विमल पान मसाला, व्ही-१ तंबाखू, आरएमडी पान मसाला, तुळशी तंबाखू व गोवा गुटखा असा ५ लाख ९० हजार ८०० रुपयांचा प्रतिबंधित माल जप्त केला. यावेळी माल घेण्यासाठी आलेला सोहेल अस्लम मुलाणी (वय २२, रा. गंजपेठ, पुणे) यालाही ताब्यात घेण्यात आले. पोलीसांनी सोहेल मुलाणी याच्याकडे अधिक चौकशी केली असता केदारीनगर येथील गोदामात आणखी मोठा साठा लपवून ठेवलेला असल्याचे समोर आले.

पथकाने त्याठिकाणी छापा टाकून १७ लाख ७३४ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. पोलिसांनी एकूण २२ लाख ९१ हजार ५३४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हा गुटखा अहमदाबाद (गुजरात) येथून खरेदी करून पुण्यात विक्रीसाठी आणल्याची माहिती आरोपींनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजयसिंह घाडगे करीत आहेत. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख पोलीस निरीक्षक (गुन्हे) ईश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किरण लिटे, अंमलदार देवा चव्हाण, सुनील चव्हाण, कार्तिक कोंडे, प्रणिल मेस्त्री, सुमित जगताप, राजू तोरे, नितीन वाघमारे, निलेश भोरडे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×