Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

विलास घुले हत्या प्रकरण पेटले; ६ आरोपी पकडले

विलास घुले हत्या प्रकरण पेटले; ६ आरोपी पकडले

मृतदेह घेऊन नातेवाईकाचा केज पोलीस ठाण्यात ठिय्या

marathinews24.com

बीड : (अनंत जाधव) – जिल्ह्यातील टाकळी (ता.केज) येथील विलास घुले हत्या प्रकरणात आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी मृत तरुणाच्या नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेत केज शहरात तीव्र आंदोलन केले. रस्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. संतप्त आंदोलनकर्त्यांनी मृतदेह थेट केज पोलिस ठाण्यात नेऊन न्यायाची मागणी केली. यावेळी ऍम्बुलन्सची तोडफोड केल्याची घटना घडली.

पुण्यात व्यावसायिकायाच्या कार्यालयावर लाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून गोळीबार – सविस्तर बातमी 

प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पावसाळी अधिवेशनात असलेल्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आंदोलनकत्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यानंतर आमदार धनंजय मुंडे यांनीही आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. दरम्यान, मृतदेह केज पोलिस ठाण्यात आणल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी स्वतः आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. या प्रकरणात आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित तीन आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची चार विशेष पथके रवाना केली आहेत. संपूर्ण घटनेच्या अनुषंगाने विशेष यंत्रणा तैनात केली असल्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी सांगितले.

प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यामुळे दि.२३ मंगळवार रोजी दिवसभर केजमध्ये याचे पडसाद उमटले. येथील बाजारपेठ ठप्प झालेली पाहायला मिळाले. वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, नातेवाईकही आक्रमक पवित्रा पहायला मिळाले. दुपारपर्यंत आंदोलनामध्ये कोणताही तोडगा निघाला नव्हता. सभागृहात आमदार धनंजय मुंडे आणि आमदार नमिताताई मुंदडा यांनी या घटनेची प्रश्न मांडताच पोलीस आयुक्त मिश्रा संभाजीनगरवरुन बीडमध्ये दाखल झाले होते. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत आणि वीरेंद्र मिश्रा यांच्यामध्ये चर्चा सुरू असुन बीड पोलिस प्रशासन काय तोडगा काढणार याकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.

घुले खून प्रकरणातील दोषींना सोडणार नाही-एसपी काँवत

विलास घुले हत्या प्रकरणासंदर्भात संपूर्ण माहिती घेत पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी यंत्रणा हलवली आहे. आतापर्यंत त्यांनी ९ पैकी सहा आरोपींना ताब्यात घेतले असून उर्वरित तीन आरोपीच्या शोधासाठी चार पथक रवाना केले आहेत. आंदोलनकर्ते आक्रमक झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी मृतदेह केर पोलीस ठाण्यात आणला होता. जे कोणी दोषी असतील त्या कोणालाही सोडणार नाही, काही आंदोलनकत्यांनी सौरभ सोनवणे यांना अटक करा अशी मागणी केली, यावेळी पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, सौरभ सोनवणे यांच्या घरचे सीसीटीव्ही फुटेव, फोनचे सीडीआर तपासले आहेत, यात त्यांचे दिवसभराचे लोकेशन घरचे आहे यामुळे ते कुठेच दोषी आढळत नाहीत, परंतु यात जे कोणी दोषी असतील त्या कोणालाही सोडणार नसल्याचे मत पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केले.

खासदार सोनवणे यांच्या मुलाचा यात संबंध नाही

विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचे चिरंजीव सौरभ सोनवणे यात सहभागी असल्याची चर्चा सुरू होती. यानंतर पोलीसांनी यात बजरंग सोनवणे यांच्या घरचे सीसीटीव्ही फुटेज सौरभ मोनवणे यांच्या मोबाईलचे सीडीआर तपासले असता यामध्ये ते कुठेही ते आढळले नसल्याचे स्पष्ट झाले.

मुंडे-बंधु भगिनींकडून सखोल तपासाची मागणी

बीड जिल्ह्यातील केजमध्ये झालेल्या हत्याप्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळात पाहायला मिळाले. परळीचे आमदार धनंजय मुंढे यांनी विधानसभेत या हत्याप्रकरणातील मास्टर माईंडचा पोलिसांकडून बचाव केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं, तसेच, याप्रकरणी सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाईची मागणीही त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. तर, मंत्री पकंजा मुंडे बांनीही, विलास घुले या तरुणाच्या मृत्यूची घटना अतिशय दुर्दैवी आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना पोलिसांनी कसल्याही दडपणाला बळी न पडता दोषीवर कडक कारवाई करावी, अशा सूचना दिल्या आहेत.

केज तालुक्यात २० जूनच्या रात्री घडलेल्या दुर्दैवी घटनेत हत्येचा कट रचून हल्ला एकावर केला. मात्र, सोडवण्यासाठी आलेल्या बिलास घुले याच्यावर चाकूचा वार करून हत्या करण्यात आली. हे संपूर्ण प्रकरण पूर्वनियोजित कट असून याचा खरा सूत्रधार कोण, बाचा शोध घेऊन विलास घुले वाला न्याय मिळावा यासाठी केजमध्ये हजारो लोक घुले कुटुंबियांच्या सोबत रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या प्रकरणात आरोपींची सर्व पाळेमुळे खोट्न काढत खरा सूत्रधार कोण आहे, याचा तपास करावा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी विधानसभेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून केली आहे.

विधानसभा अध्यक्षांकडून आश्वासन विलास घुले या निष्पाप तरुणाला विनाकारण आपले प्राण गमवावे लागले, याचा तीव्र निषेध करत कुटुंबीय व हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असून, हत्येच्या आज चौथ्या दिवशी सुद्धा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्यास घुले कुटुंबियांनी नकार दिला आहे. दुसरीकडे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले असुन केजमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला असून, पोलिस ठाणे व अन्य ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू आहे. दरम्यान, हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, या प्रकरणी कट रचून एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला तर दुसऱ्या व्यक्तीची हत्या असा दुहेरी गुन्हा घडलेला असून, पोलिस प्रशासनाने सर्व बाजूंनी वस्तुनिष्ठ तपास करून मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन सर्व आरोपींना अटक करावी, याबाबत केज पोलिसांना निर्देश दिले जावेत, अशी मागणी केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर यांनी धनंजय मुंडे यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन योग्य कार्यवाहीचे निर्देश गृह विभागाला दिले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×