Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पुण्यात व्यावसायिकायाच्या कार्यालयावर लाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून गोळीबार

व्यावसायिकाकडे खंडणी मागून गोळीबार

marathinews24.com

पुणे – खंडणीसाठी व्यावसायिकाच्या कार्यालयासमोर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २२ ) रात्री हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी भागात घडली. व्यावसायिकाकडे खंडणी मागून गोळीबार प्रकरणात लाॅरेन्स बिष्णोई टोळीचा हात असल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्रियकराच्या मदतीने होणार्‍या नवर्‍याचा केला खून – सविस्तर बातमी

तक्रारदार व्यावसायिकाचे हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी भागात पाईप आणि पोलाद विक्रीचा व्यवसाय आहे. तेथे त्यांचे गोदाम आणि कार्यालय आहे. सोमवारी (दि. २२ जून) दुपारी साडेचारच्या सुमारास व्यावसायिकाच्या मोबाइल क्रमांकावर अर्जुन बिष्णोई असे नाव सांगणाऱ्या एकाने संपर्क साधला. लाॅरेन्स बिष्णोई टोळीतील साथीदार असल्याचे सांगून व्यावसायिकाकडे खंडणी मागितली. घटनेनंतर घाबरलेल्या व्यवासायिकाने सायंकाळी सातच्या सुमारास वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. व्यावसायिकाचे कार्यालय फुरसुंगी भागात असल्याने पोलिसांनी पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण फुरसुंगी पाेलीस ठाण्याकडे सोपविले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

तक्रार दाखल करुन गुन्हा दाखल करण्याचे काम फुरसुंगी पोलीस ठाण्यात सुरू होते. रात्री सव्वा आठच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी व्यावसायिकाच्या फुरसुंगीतील कार्यालयाच्या दरवाज्यावर पिस्तुलातून चार गोळ्या झाडल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास सुुरु केला. गोळीबार करणारे आरोपी दुचाकीवरुन फुरसुंगीतून सासवड रस्त्याने पसार झाले. पोलिसांनी व्यावसायिकाच्या कार्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पसार झालेल्या आरोपींचा माग काढण्यासाठी गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे, असे गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवडमधील रावेत भागात असलेल्या फर्निचर व्यावसायिकाच्या दालनासमोर गोळीबार करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. १५ दिवसांपूर्वी रावेत भागात गोळीबार करण्यात आला. फर्निचर व्यावसायिकाला लाॅरेन्स बिष्णोई टोळीतील सराईतांनी खंडणीसाठी धमकाविले होते. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तपास करुन खंडणी प्रकरणात आरोपींना अटक केली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×