व्यावसायिकाक केतन अगरवाल यांच्या खूनाची उकल
marathinews24.com
पुणे – प्रियकराच्या मदतीने तरूणीने होणार्या नवर्याला लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी नेउन त्याला ढकलून देत खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खूनापुर्वी तिने होणार्या नवर्यासोबत फोटो, व्हिडिओ काढले. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या प्रियकराला मदतीला घेउन व्यावसायिक असलेल्या तरूणाला कठड्यावरून ढकलून देत त्याचा काटा काढला. मात्र, पोलीस तपासाची कटकट मागे लागू नये, यासाठी तिने आपला होणारा नवरा पाय घसरून पडल्याचा बनाव पोलिसांना सांगितला होता. तपासाअंती दोघांनी मिळून खून केल्याचे उघडकीस आले आहे.
दुबईतून स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने महिलेची फसवणूक – सविस्तर बातमी
केतन विशाल अगरवाल (वय २५ रा. लोढा बेलमॅडन्डो टॉवर गहुंजे, ता. मावळ) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. सिया प्रविण गोयल (वय २० रा. लिलाकुंज, ७८ / २१ न्यु एरा सोसायटी गंगाधाम समोर कोंढवा रोड, बिबवेवाडी) आणि चेतन बाबुलाल चौधरी (वय २२, रा. पार्श्वनगर, बी ४/३०१ कोंढवा बु ता. हवेली) यांना अटक करण्यात आली आहे. विशाल देवीचंद अगरवाल (वय ४६) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
विशाल अगरवाल हे मोठे बांधकाम व्यावसायिक असून, पिंपरी-िंचचवड परिसरात त्यांचे मोठे प्रस्थ आहे. त्यांचा मुलगा केतन अगरवाल यानेही व्यवसायात लक्ष घातले होते. काही महिन्यांपुर्वी केतनचा आणि मार्वेâटयाड परिसरातील सिया गोयल हिच्याशी लग्न ठरले होते. नोव्हेंबर २०२६ मध्ये होणार्या लग्नासाठी अगरवाल कुटूंबियाने राजस्थान जयपूरमध्ये तब्बल १७ कोटी रूपये खर्च करून पॅलेस बुक केला होता. तसेच पुण्यातून दोन विशेष विमानाचे बुकींगही केले होते. दरम्यान, केतन आणि सिया यांच्यात संवाद वाढल्यानंतर ते एकमेकांना भेटत होते. मात्र, सियाचे एका तरूणासोबत अफेअर असल्यामुळे तिला लग्न मान्य नव्हते. सियाचा वाढदिवस असल्यामुळे दोघेही १८ जूनला लोणावळा परिसरातील किल्ल्यावर फिरण्यासाठी जाणार होते. त्याची माहिती तिने बॉयफ्रेंड चेतन चौधरी याला दिली होती.
किल्ल्यावर फोटो, व्हिडिओ काढल्यानंतर दोघेही फिरत असताना आरोपी बॉयफ्रेंड चेतन चौधरी हा सुद्धा त्यांच्या मागे फिरत होता. याची भणक केतनला नसताल्यामुळे तो बिनधास्तपणे फिरत होता. मात्र, त्याची होणारी बायको सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन यांनी अगोदरच केतनचा काटा काढण्याचा डाव रचला होता. प्लॅनप्रमाणे सियाने केतनला फोटो काढण्याचा बहाणा करीत एकट्यालाच कठड्याजवळ उभा केले. त्याचेवळी परिसरात थांबलेल्या बॉयफ्रेंड चेतनसह सियाने केतनने आजूबाजूला कोणीही नसल्याची खात्री केली. केतनला जोराचा धक्का देउन दरीत ढकलून दिले. पोलिसांची कटकट वाचवण्यासाठी त्यांनी केतन फिरत असताना पाय घसरून खाली पडल्याची बतावणी पोलिसांकडे केली.
सियाने दिलेल्या माहितीनुसार हर्ष कुलदीप अगरवाल यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली. याप्रकरणी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्वतः लक्ष देवून प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. सखोल चौकशी करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला देउन दोन विशेष पथकांची नियुक्ती केली. पथकाने प्रकरणात प्रॉपर्टी वाद, प्रेमसंबंधाचा प्रकार आहे का? याबाबत तपास सुरू केला. त्यावेळी मुलगी सियाचे प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. त्यादरम्यान केतनचे वडील विशाल अगरवाल यांनी मुलीचे प्रेमसंबंध असल्याने त्यांनी संगणमताने मुलाला किल्ल्यावरून ढकलून दिल्याची फिर्याद लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी चेतन चौधरी याला ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपी चेतनने खुनाची कबुली दिली असून, सियासोबत प्रेमसंबंध होते. तिला केतन अगरवालसोबत लग्न करायचे नव्हते. प्रेमसंबंधात आडकाठी आणत असल्याचे कारणावरून आम्ही केतनला किल्ल्यावरून ढकलून देत त्याचा खून केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पोलीस उपअधीक्षक (गृह) राजेंद्र मायने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, एपीआय मनोज पवार, उपनिरीक्षक अभिजीत सावंत, संतोष शेळके, तुषार भोईटे, गणेश होळकर, संजय पडयाळ, अजित भुजबळ, अमोल शेडगे, भारत मोहोळ, चेतन पाटील, गणेश धनवे, संतोष भापकर, वैभव सावंत, अजय देडे, भाउसाहेब पुंड, समीर तांगडे, महिला पोलीस अंमलदार नंदा कदम, सुजाता कदम, शरयु बिरंबुळे, जय पवार, सागर धनवे, अमोल कसबेकर, संजय पंडीत, प्रशांत तुरे, पवन कराड, सचिन गायकवाड यांनी केली.























