Breking News
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवातमोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटपुण्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूकीत बदलपुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणीविवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर‘विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजरपुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागेमोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

दुबईतून स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने महिलेची फसवणूक

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने दोघांची १३ लाखांची फसवणूक

हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – दुबईहून स्वस्तात सोने आणून देण्याच्या आमिषाने महिलेची साडेसहा लाखांची फसवणूक करणाऱ्या एकाला हडपसर पोलिसांनी अटक केली. तेजस तानाजी मोहिते (वय २६, रा.साई मंदिराजवळ, शाहूनगर, पिंपरी-चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बनावट सौंदर्य प्रसाधनाची विक्री – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३१ वर्षीय महिला हडपसर भागात राहायला आहे. आरोपीशी महिलेची जानेवारी महिन्यात ओळख झाली होती. आरोपी मोहितेने महिलेला दुबईहून स्वस्तात सोने आणून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर त्याने महिलेकडून ६ लाख ५९ हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर त्याने महिलेला सोने दिले नाही. महिलेने त्याच्याकडे पैेसे परत मागितले. तेव्हा त्याने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. मोहिते याला पोलिसांनी अटक केली. त्याने अशा पद्धतीने आणखी किती जणांची फसवणूक केली, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×