Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

बनावट सौंदर्य प्रसाधनाची विक्री

बनावट सौंदर्य प्रसाधनाची विक्री

औषध विक्रेत्यासह वितरकाविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – बनावट सौंदर्य प्रसाधनांची (काॅस्मेटिक्स) ग्राहकांना विक्री केल्याचा प्रकार अन्न आणि ओैषध प्रशासन विभागाने (एफडीए) उघडकीस आणला. याप्रकरणी रविवार पेठेतील एका वितरकासह ओैषध विक्री दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एफडीएचे ओैषध निरीक्षक श्रीकांत पाटील (वय ३९) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ओम केमिस्टचे मालक गणेश पुनाराम चौधरी, तसेच माताजी ट्रेडर्स या वितरकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोंदू राधामोहन मिश्रासह साथीदारांची येरवडा कारागृहात रवानगी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनापती बापट रस्त्यावरील वेताळबाबा चौकात ओम केमिस्ट हे ओैषध विक्रीचे दुकान आहे. या दुकानातून सेटाफिल जनरल स्किन केअर या उत्पादकाच्या बनावट सौंदर्य प्रसाधनांची विक्री होत असल्याची माहिती एफडीएला मिळाली. २१ जून रोजी एफडीएच्या पथकाने कारवाई केली. तेथून बनावट सौंदर्य प्रसाधन जप्त करण्यात आले. चौकशीत रविवार पेठेतील एका वितरकाने बनावट सौंदर्य प्रसाधनाचा पुरवठा होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एफडीएच्या पथकाने ओैषध विक्रेत्यासह वितरकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×