Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

गुरू षष्ट्यब्दपूर्तीचा हृद्य सोहळा संगीत घराण्याचे सौदर्यमूल्य अभ्यासणे, जपणे महत्त्वाचे : पंडित सत्यशील देशपांडे

गुरू व शिष्याचे नाते जन्मोजन्मीचे-पंडित ओंकार गुलवडी

marathinews24.com

पुणे – अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात सर्व घराण्यांची सौंदर्यमूल्ये अभ्यासणे व जपणे महत्त्वाचे आहे. गुरूंच्या सहवासाने जीवन सूरमयी व आनंदी होते. धनंजय व कविता खरवंडीकर यांच्याशी शास्त्रीय संगीताविषयी होणारा संवाद या हृदयीचे त्या हृदयी असे हितगुज ठरते, असे मत ज्येष्ठ गायक व संगीत अभ्यासक पंडित सत्यशील देशपांडे यांनी व्यक्त केले.

पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ निमित्त स्पर्धा; शाळा-महाविद्यालयांना सोमवारी सुटी – सविस्तर बातमी

ज्येष्ठ तबलावादक व संगीतकार पंडित धनंजय खरवंडीकर आणि आग्रा घराण्याच्या गायिका विदुषी कविता खरवंडीकर यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त अभिष्टचिंतन व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी पंडित सत्यशील देशपांडे बोलत होते. ज्येष्ठ तबलावादक पंडित ओंकार गुलवडी यांची प्रमुख उपस्थिती होती. कल्परूप संस्थेच्या संचालिका व विदुषी खरवंडीकर यांच्या शिष्या धरित्री जोशी-बापट यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रम एसएनडीटी सभागृहात झाला.

पंडित धनंजय खरवंडीकर यांचा सत्कार पंडित ओंकार गुलवडी तर विदुषी कविता खरवंडीकर यांचा सत्कार पंडित सत्यशील देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आला. तत्पूर्वी शिष्यांच्या हस्ते खरवंडीकर दाम्पत्याचे गुरुपूजन झाले. रागसंगीत व बंदिशींविषयी आजच्या काळात आस्था कमी प्रमाणात जाणवते असे निरीक्षण नोंदवून पंडित सत्यशील देशपांडे म्हणाले, अशा काळात कविता खरवंडीकर यांना बंदिशींमधील मर्म जाणून घेण्याची ओढ आहे आणि या विषयी त्या सखोल चिंतनही करीत आहेत. धनंजय यांचे वादन उपज अंगाचे असून तालाचे व गायनाचे सौंदर्य वाढविणारे असते.

पंडित ओंकार गुलवडी म्हणाले, गुरू व शिष्याचे नाते जन्मोजन्मीचे असते. गुरूचे प्रेम व आशीर्वाद मिळणे हे शिष्यासाठी उर्जादायी असते. कला क्षेत्रात धनंजय व कविता यांचे योगदान मोठे आहे. धनंजय यांच्या तबला वादनातील रचना या पारंपरिक असल्या तरी त्यात नाविन्यपूर्णता जाणवते.

सत्काराविषयी बोलताना पंडित धनंयज खरवंडीकर म्हणाले, गुरूंचे कौतुकाचे शब्द आमच्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे आहेत. गुरूंचे आशीर्वाद व मार्गदर्शनानेच आम्ही घडत गेलो. आमच्या हातून या क्षेत्रात अजूनही भरीव कार्य घडावे अशी इच्छा आहे.

कविता खरवंडीकर म्हणल्या, गुरूंनी भरभरून दिलेल्या ज्ञानाविषयी आम्ही कृतज्ञ आहोत. गुरू हा शिष्याला घडवत असताना स्वत:ही घडत असतो.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात विदुषी कविता खरवंडीकर यांची गायन मैफल रंगली. मैफलीची सुरुवात राग केदारमधील ‘बहुत गई, थोडी रही’ या बडा ख्यालने केली. त्यानंतर मध्यलय तीन तालातील ‘कंगनवा मोरा अत ही अमोला’ ही रचना सादर करून द्रुत एकतालातील ‘ए नवेली नार’ ही रचना ऐकविली. त्यानंतर राग नट बिहागमधील ‘कैसे कैसे बोलत मोसे लोगवा’ या रचनेला जोडून द्रुत तीन तालातील ‘झन झन झन पायल बाजे’ ही रचना प्रभावीपणे सादर केली.

मैफलीची सांगता मिश्र तिलंगमधील ‘सावरिया तोपे वारी’ या ठुमरीने केली. मधुर आवाज, शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया आणि भावपूर्ण सादरीकरणातून ही मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. पंडित धनंजय खरवंडीकर (तबला), पंडित उदय कुलकर्णी (संवादिनी), धरित्री जोशी-बापट, श्रुती खरवंडीकर (तानपुरा, सहगायन) यांनी साथसंगत केली.प्रास्ताविक धरित्री जोशी-बापट यांनी कार्यक्रमाविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन आरती पटवर्धन यांनी केले तर आभार अनघा देशपांडे यांनी मानले. कलाकारांचा सत्कार दिप्ती जोशी यांच्या हस्ते करण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×