Breking News
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

परकीय नागरिकांची माहिती लपविणे अंगलट

परकीय नागरिकांची माहिती लपविणे अंगलट

पुण्यात रियल इस्टेट एजंटासह घरमालकावर कारवाई

marathinews24.com

पुणे – परकीय नागरिकाची माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी संबंधित रियल इस्टेट एजंटासह घरमालकावर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याच्याविरूद्ध भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम २२३, ३(५) प्रमाणे दि.०२ जूनला गुन्हा दाखल केला आहे. परकिय नागरिक रियल इस्टेट एजंट अदनान शबीर हुसेन बोहरा (वय २९ रा. सईदा मंजिल, मक्का मजीदजवळ भाग्योदयनगर कोंढवा) याच्यासह घरमालक कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत.

वादातून मोटार चालकाने दाम्पत्याला केली मारहाण – सविस्तर बातमी 

कोंढवा खुर्द परिसरात परकीय नागरीक अनधिकृत वास्तव्य करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार हुसेन शेख, अंमलदार सावंत, मोरे यांनी २ जूनला कोणार्कपुरम सोसायटीत धाव घेतली. त्यावेळी फ्लॅटमध्ये एक महिला परकिय नागरिक राहत असल्याचे दिसून आले. त्यावेळी पथकाने त्यांना घरमालक यांच्याकडे परकिय भाडेकरूबाबत विचारपूस केली. त्यांनी कोणत्याही प्रकारे पोलीस व्हेरिफेकशन व भाडेकरारनामा केला नसल्याचे सांगितले. दरम्यान, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता सन २०२३ चे कलम १६३ (३) प्रमाणे काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार शहरात वास्तव्यास असलेल्या भाडेकरूंची माहिती पोलिसांना लेखी स्वरुपात माहिती कळविणे बंधनकारक आहे.

आदेशाचे उल्लंघन करीत बिनधास्तपणे परकीय नागरिकाला वास्तव्यास ठेवल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी रियल इस्टेट एजंट अदनान शबीर हुसेन बोहरा व घरमालक याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अब्दुल रऊफ शेख, पोलीस निरीक्षक(गुन्हे) नवनाथ जगताप यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस अंमलदार किटे, सुतार, हुसेन शेख, सावंत, मोरे यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×