Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

हिंदू महासभा पुणे महापालिकेच्या आखाड्यात

निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर

marathinews24.com

पुणे – अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षाची पहिली आठ जणांची उमेदवार यादी आज जाहीर करण्यात आली. हिंदू महासभेचे प्रदेश कार्याध्यक्ष आनंद दवे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

ज्येष्ठ शिल्पकार डॉ राम सुतार यांचे निधन – सविस्तर बातमी

पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हिंदू महासभा पूर्ण ताकदीने निवडणूक रिंगणात उतरत असून हिंदुत्ववादी विचारधारेवर आधारित विकासात्मक राजकारण हा पक्षाचा मुख्य अजेंडा असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. व्यावसायिक, पत्रकार, गृहिणी, सामाजिक कार्यकर्त्यांचा यादीत समावेश आहे.

पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या उमेदवार यादीत पुढील उमेदवारांचा समावेश आहे. विवेक परदेशी (प्रभाग २३ ड),प्रशांत भालेराव (प्रभाग २४ ड),सूर्यकांत कुंभार (प्रभाग २५ ब),तृप्ती तारे (प्रभाग २५ क),अजित जोशी (प्रभाग २५ ड),नितीन शुक्ल (प्रभाग ३४ ड),विद्या घटवाई (प्रभाग ३५ ब), राजेंद्र देशपांडे (प्रभाग ३७) हे उमेदवार निवडणूक लढणार असून पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

‘मतदारांची आम्ही किंमत नाही करणार,आम्ही ना यात्रा काढणार, ना करमणूकीचे कार्यक्रम घेणार’, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे आणि शहराचा सर्वांगीण विकास साधणे हा या उमेदवारांचा मुख्य उद्देश असेल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला. चांगले, सुशिक्षित आणि मध्यम वर्गीय उमेदवार देऊन आम्ही फक्त दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचा, सुरक्षित जीवन देण्याचा प्रयत्न करणार, असे आनंद दवे यांनी सांगितले.

या वेळी हिंदू महासभेचे प्रदेश सहकार्यवाह मनोज तारे, प्रदेश सरचिटणीस नितीन शुक्ल, प्रदेश संघटन प्रमुख उमेश कुलकर्णी, प्रदेश महिला समन्वयक सौ.अदिती जोशी, तसेच महिला आघाडी अध्यक्ष शिल्पा भोसले-बुडुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते. उर्वरित प्रभागांसाठी उमेदवारांची पुढील यादी लवकरच जाहीर करण्यात येणार असून निवडणूक प्रचार अधिक व्यापक स्वरूपात राबवला जाणार असल्याची माहिती हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×