Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयाच्या शिरपेचात मानाचा बहुमान

सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेला राष्ट्रीय मान्यता मंडळाचे सन्मान पत्र

marathinews24.com

बीड (अनंत जाधव)- जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या
स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (स्वाराती) शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सूक्ष्मजीवशास्त्र विभागांतर्गत कार्यरत असलेल्या प्रयोगशाळांना दर्जेदार सेवेबद्दल ‘राष्ट्रीय मान्यता मंडळ’ (NABL) कडून मानाचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. १६ जानेवारी २०२६ रोजी या मान्यतेचे अधिकृत पत्र मिळाल्याने महाविद्यालयाची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026 साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना – सविस्तर बातमी

विभागात कार्यरत असलेले एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र (ICTC), स्टेट रेफरन्स लॅबोरेटरी आणि व्हायरल लोड या प्रयोगशाळा २०२० पासून एन ए बी एल मानांकन प्राप्त आहेत. या प्रयोगशाळांमध्ये प्रामुख्याने एचआयव्ही संशयित रुग्णांची चाचणी, त्यांचे समुपदेशन आणि एचआयव्ही बाधित रुग्णांमधील विषाणूंची संख्या तपासणे अशा अत्यंत महत्त्वाच्या चाचण्या केल्या जातात. केवळ संख्यात्मकच नव्हे तर गुणात्मक दृष्टिकोनातूनही या प्रयोगशाळांनी राज्यात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. प्रतिवर्षी या केंद्रांमार्फत अंदाजे ४८ हजारांहून अधिक चाचण्या केल्या जातात, जी आकडेवारी राज्यातील इतर शासकीय प्रयोगशाळांच्या तुलनेत उल्लेखनीय मानली जाते.

२७ व २८ डिसेंबर २०२५ रोजी एन ए बी एल संस्थेच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून या प्रयोगशाळांचे सखोल परीक्षण करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या प्रक्रियेत प्रयोगशाळेतील उपकरणांची अचूकता, कामकाजाची पद्धत, स्वच्छतेचे निकष आणि गुणवत्ता तपासण्यात आली. या सर्व चाचण्यांमध्ये प्रयोगशाळेने उच्च मानांकन राखल्याने १६ जानेवारी रोजी या प्रयोगशाळेला पुढील कालावधीसाठी अधिकृतरीत्या मान्यता बहाल करण्यात आली.

या यशामागे अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जाधव आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भाऊसाहेब मुंडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सहयोगी प्राध्यापक डॉ. संदीप निळेकर आणि डॉ. दिपाली कुलकर्णी यांनी या परीक्षणासाठी विशेष सहकार्य केले. प्रयोगशाळेचे दैनंदिन कामकाज आणि एन ए बी एल परीक्षणाची संपूर्ण जबाबदारी नोडल ऑफिसर म्हणून डॉ. अमित लोमटे व डॉ. अर्जुन जाधव यांनी यशस्वीपणे पार पाडली. प्रयोगशाळेतील सर्व समुपदेशक आणि तंत्रज्ञांनी घेतलेल्या परिश्रमामुळेच हे यश प्राप्त झाले असून, यामुळे परिसरातील सामान्य रुग्णांना अधिक दर्जेदार आणि खात्रीशीर वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×