पुण्यात गुंडाने बांधलेले अवैध वारकरी भवन जमीनदोस्त

पोलिसांकडून कारवाईचा बडगा

marathinews24.com

पुणे – शहरातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर याने नाना पेठेत बेकायदेशीररित्या वारकरी भवनाची उभारणी केली होती. त्यामुळे परिसरातील रस्त्याला अडथळा निर्माण झाला होता. त्यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने संबंधित वारकरी भवन जमीनदोस्त केले आहे. दरम्यान, त्याठिकाणी उद्याही तोडकाम सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्यात मानव-बिबट संघर्ष नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न – सविस्तर बातमी

अवैधरित्या मार्गाने कमवलेल्या पैशांतून आंदेकर टोळीने नाना पेठेत वारकरी भवन उभारले होते. त्याठिकाणी अनेकवेळा बेकायदेशीर कामे केली जात असल्याचा पोलिसांचा संशय होता. संबंधित बांधकामामुळे परिसरातील वाहतूकीसह रस्त्यांना अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे समर्थ पोलिसांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या मदतीने संबंधित बांधकाम बुलडोझरच्या मदतीने पाडले. वारकरी भवनाची इमारत आणि इतर संपूर्ण बांधकामे बेकायदेशीरपणे, परवानगी न घेता, रस्त्यांना अडथळा निर्माण करून बांधण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. उर्वरित ते बांधकाम उद्याही तोडण्यात येणार आहे.

सेवेच्या बहाण्याने भवनाचा अवैध कामांसाठी वापर

शहरातील नाना पेठेत आंदेकरने वारकरी भवनाची निर्मिती केली होती. वारीच्या काळातच त्याचा उपयोग वारकर्‍यांच्या राहण्यासाठी केला जात होता. इतरवेळी संबंधित ठिकाणी भवनाचा वापर अवैध धंदे, खंडणी व इतर गुन्हेगारी कारवायांसाठी होत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी महापालिका प्रशासनासोबत पत्रव्यवहार करीत बांधकाम पाडले आहे.

आयुष कोमकर हत्येनंतर पोलिसांकडून कारवाईचा बडगा

कुख्यात गुंड बंडू आंदेकर याचा मुलगा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या सप्टेंबर २०२४ मध्ये कोमकर आणि गायकवाड टोळीने केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने नातू आयुष कोमकर याच्यावर गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर वनराजच्या हत्येत पिस्तूल पुरवणारा आरोपी समीर काळे याचा भाउ गणेश काळे याचाही आंदेकर टोळीने नुकताच खून केला आहे. दरम्यान, गुन्हेगारी टोळीविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यासाठी पोलिसांनी आंदेकरला मोक्का लावला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×