Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

पिस्तुलाच्या धाकाने लूटमार करणारा तोतया पोलीस गजाआड

पिस्तुलाच्या धाकाने लूटमार करणारा तोतया पोलीस गजाआड

एटीएममधून पैसे काढणाऱ्या कामगारांची केली होती लूट

marathinews24.com

पुणे – एटीएममधून पैसे काढणाऱ्या कामगारांना पिस्तुलाचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या चोरट्याला बाणेर पोलिसांनी अटक केली. श्रीराम विकास हानवते (वय ३३, रा. एलिगंट रेसीडन्सी, यमुनानगर, निगडी) असे अटक केलेल्याचे तोतया पोलिसाचे नाव आहे. किसनकुमार पोरराराम ध्रुव (वय २७,रा. पाषाण) याने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तो मूळचा छत्तीसगडचा आहे.

एसटी प्रवासी महिलेकडील दागिने चोरणाऱ्या तिघी अटकेत – सविस्तर बातमी 

बाणेरमधील पारपत्र कार्यालयाजवळ १९ ऑक्टोबरला ध्रुवला हानवते याने पोलीस असल्याची बतावणी करुन लुटले होते. धुव्र आणि त्याचा मित्राने दिवाळीनिमित्त बँकेच्या एटीएममधून ८ हजार रुपये काढले होते. पारपत्र कार्यालयासमोर हानवते दुचाकीवरुन आला. त्याने खाकी रंगाचे जॅकेट घातले होते. पोलिसांसारखे बुटही त्याने घातले होते. हानवते यांनी धुव्र आणि त्याचा मित्राला अडवले. पोलीस असल्याची बतावणी केली. तुन्ही चोरी केली आहे, असे सांगितले. तुमची झडती घ्यायची आहे, असे सांगून हानवते आधारकार्ड दाखविण्यास सांगितले.

पसार होण्याचा प्रयत्न केला तर गोळी मारेल, अशी धमकी दिली. दोघांना पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. दोघांकडील १३ हजारांची रोकड लांबवून तो पसार झाला. घाबरलेला ध्रुव आणि त्याचा मित्र बाणेर पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
हानवते दुचाकीवरुन पसार झाला होता. दुकानाच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याचा माग काढला. हानवतेला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंढे, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, सहायक निरीक्षक के. बी. डाबेराव, उपनिरीक्षक संदेश माने, पोलीस कर्मचारी बाबा आहेर, किसन शिंगे, अप्पा गायकवाड, संदेश निकाळजे, अतुल इंगळे, गजानन अवतिरक, प्रदीप खरात, प्रीतम निकाळजे यांनी ही कामगिरी केली.

आरोपी हानवते हा सराइत आहे. त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात एटीएमची तोडफोड करुन रोकड चोरीचा प्रयत्न, तसेच निगडी पोलीस ठाण्यात लूटमारीचा गुन्हा दाखल आहे. प्राथमिक तपासात हानवतेने एटीएममधून पैसे काढणाऱ्या परराज्यातील कामगारांना पोलीस असल्याची बतावणी करुन लूटमारीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे, असे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×