Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

पुण्यात सराईतांची धरपकड, तिघांना बेड्या

४ गावठी पिस्तूल जप्त, काळेपडळ पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – शहरातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सराईतांची उचलबांगडी करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार काळेपडळ पोलिसांनी केलेल्या कारवाईत तिघा सरार्ईतांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ४ गावठी पिस्तूल, पाच काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. आशिफ सबीरखा तेली (वय २१ रा. गल्ली नं. १५, सय्यदनगर, हडपसर) यश सुभाष मदने (वय २० रा. भीमरत्ननगर, कसबा, बारामती) प्रथमेश संदीप लोंढे (वय २४ रा. वडगाव निंबाळकर, निरा रोड, बारामती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

तरुणाला जादा परताव्याचे आमिष पडले २३ लाखांना – सविस्तर बातमी

आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शहरातील कायदा सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. त्याअनुषंगाने हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराईतांची उचलबांगडी करण्याचेही सूचित केले आहे. अवैद्य धंदे, रेकॉर्डवरील आरोपी, तडीपार, शस्त्र बाळगणार्‍यांची झाडाझडतीला सुरूवात झाली आहे. दरम्यान, काळेपडळ पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार शाहीद शेख व दाऊद सय्यद यांना सराईत आशिफ तेली हा दोन साथीदारांसह महंमदवाडीत थांबल्याची माहिती मिळाली. गुन्हा करण्यासाठी त्यांच्याकडे पिस्तूल असल्याची शक्यता असल्याचे समजले.

काळेपडळ ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनायक गुरव यांनी महंदवाडीत धाव घेतली. त्यावेळी पोलीस पथकाला पाहून सराइ्रत तेली आणि त्याचे साथीदार घाबरलेल्या अवस्थेत मिळून आले. त्यांच्याकडे ४ पिस्टल, ५ जिवंत राऊंड असा अडीच लाखांचा शस्त्रसाठा मिळून आला. तिघांविरूद्ध बीएनएस कलम ३ (५) भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) व मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक अमर काळंगे, एपीआय अमित शेटे, प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, संजय बागल,अमोल फडतरे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे यांनी केली.

कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने परिमंडळ पाचमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात येत आहे. त्याद्वारे सराईतांची झाडाझडती घेणे, तडीपार आरोपींना ताब्यात घेणे, अवैध धंदे चालकाविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. काळेपडळ पोलिसांनी तिघा सराईतांना ताब्यात घेउन चार पिस्तूल, पाच काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला आहे. – डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ पाच

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×