Breking News
डीजे, लेझरमुक्त गणेशोत्सवाचा आदर्श ‘पुणे पॅटर्न’ निर्माण व्हावाशिक्षणाच्या बळावर भटके-विमुक्त समाजाने प्रगतीची नवी ओळख निर्माण करावीशाश्वत विकासाची उद्दिष्टपूर्ती वेगाने करण्यासाठी विभागांनी अभिसरणातून काम करावेपुण्यात ‘भटके-विमुक्त दिवस’ निमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय कार्यक्रम संपन्नपीएमपी बसच्या धडकेत सायकलवरील एकाचा मृत्यूमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्यमेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतपुणेकर ग्राहकांसाठी भांडारकर रस्त्यावर सुरु झाले ‘निरुपाज् येवला पैठणी अँड सिल्क सारीज’चे दालनराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ‘ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कार’ वितरणबार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषण

मुलगी आमचीच असल्याचे मानून तपास – पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल

नसरापूर अत्याचार हत्याकांड प्रकरण, आरोपीला फाशीची शिक्षा

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील नसरापूरात अल्पवयीन अल्पवयीन मुलीवरील अत्याचार हत्याकांडाचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांच्या एसआयटी टीमने उत्तमरित्या केला. पीडित मुलगी आमचीच असल्याचे मानून तपासाला गती देउन अवघ्या १५ दिवसांत १२०० पानांचे चार्जशीट न्यायालयात दाखल केले. नराधमाला न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावल्याने संपुर्ण पथकाने अहोरात्र केलेल्या कामाचे समाधान आज मिळाले आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अ‍ॅड. अजय मिसर, उपविभागीय अधिकारी राजेंद्रसिंह गौर, राजेंद्र मायणे, विजयमाला पवार उपस्थित होत्या.

विलास घुले हत्या प्रकरण दहाव्या आरोपीला घेतले ताब्यात – सविस्तर बातमी

पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल म्हणाले, नसरापूरातील केसमध्ये आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने उन्हाळी सुटी सोडून ब्रेक न घेता खटला चालवला. पोलिसांच्या एसआयटी टीमने अतिशय चांगला तपास केला असून, १६ दिवसात ५५ साक्षीदार तपासले आहेत. १ मेला गुन्हा घडल्यानंतर २ मे ला पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल झाला. त्यावेळेस कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, आम्ही आरोपीविरूद्ध १५ दिवसात चार्जशीत करून, त्याला शिक्षा होईल असे आंदोलकांना सांगितले होते. दरम्यान, तपास कसा असावा, प्लॅन ऑफ अ‍ॅक्शन तयार केला होता. प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिली होती. तंत्रज्ञान वापर कसा करायचा, ई-साक्ष कशी करायची याची संपूर्ण तयारी केली होती. पहिला पंचनामा झाल्यानंतर दुसरा पंचनाम्यावेळभ् आरोपीला घटनास्थळी न नेता पोलीस ठाण्यात व्हर्चुअल पंचनामा केल्याचे त्यांनी सांगितले.

अ‍ॅड. अजय मिसर म्हणाले, आरोपी भीमराव कांबळे याचा हा पूर्वनियोजित कट होता. त्याने जागेची रेकी करून स्वतःचे साहित्य त्याठिकाणी ठेवले होते. गाईचे वासरू दाखवते असे सांगून त्याने ३ वर्ष, दोन महिने असलेल्या चिमुरडीला गोठ्यात नेले. याचे संपुर्ण चित्रीकरण सीसीटीव्हीमध्ये झाले आहे. तब्बल ३९ मिनिटांच्या कालावधीत आरोपीने पीडितेवर वारंवार बलात्कार केला. यासंदर्भात आम्ही न्यायालयात सविस्तर युक्तिवाद केला. आरोपीचे विविध दाखले, मयत दाखले मांडण्यात आले. दरम्यान, यापुर्वीही आरोपी ३५ वर्षांचा असताना त्याने ६५ वर्षीय महिलेवर अत्याचार केला होता. संबंधित गुन्ह्यात त्याची मुक्तता झाल्याने आरोपीची हिम्मत वाढली. हा अतिशय गंभीर गुन्हा, क्रूरतेचा कळस आहे. त्याने मृतदेहावर अत्याचार केले आहेत, यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही.

न्यायालयाने एसआयटीच्या कामाचे केले कौतुक

न्यायालयाने पुणे ग्रामीण पोलिसांच्या एसआयटी पथकाने तपासाचे विशेष कौतुक केले आहे. पथकात उपअधीक्षक राजेंद्र मायणे, पोलीस निरीक्षक विजयमाला पवार, एपीआय दत्ताजीराव मोहिते, एपीआय तुकाराम राठोड, उपनिरीक्षक माधुरी झेंडगे, एएसआय वाचक शंकर नवले, हवालदार नाना मदने, गणेश धनवे, ए.आर. चमनशेख, अक्षय नलावडे, एम.एस. भगत, संदीप सपकाळ, संतोष भापकर, भारत मोहोळ, श्रीधर जगदाळे, मंगेश काळे, सौरभ थोरात, अमोल शेडगे, मंगेश थिगळे, अतुल फरांदे, खंडू निश्चीत, मंगेश कुंभार, संजय शेडगे, नितीन रावते, मयूर निंबाळकर, राहूल भडाळे, समीर भालेराव, गणेश लडकत, सायबा बाबर, शिवम कुंभार यांनी कामकाज पाहिले.

पीडित बाळाचा मृतदेह बघितल्यानंतर मनात प्रचंड वेदना झाल्या. बाळाला पाहून मला खूप दुःख झाले, आरोपीने किळसवाणा प्रवृत्तीने तिचा घात केला आहे. आपल्या बाळांचे संरक्षण करणे आपली जबाबदारी आहे, मी सुध्दा एक आई म्हणून या घटनेचा आम्ही खूप बारकाईने तपास केला.

विजयमाला पवार, पोलीस निरीक्षक, तपासी अधिकारी

आमच्या टीमने मेहनतीने दिवसरात्र तपास केला असून, आज वटपौर्णिमेला छोट्या सावित्रीला न्याय मिळवून दिल्याचे समाधान आहे. पीडित मुलगी आपलीच असल्याचे मानून प्रत्येकाने झोकून काम केले आहे.

संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×