हत्येच्या निषेधार्थ टाकळीत ग्रामस्थांनी काढला कॅन्डल मार्च
marathinews24.com
बीड : (अनंत जाधव) – जिल्ह्यातील टाकळी (ता. केज) येथील विलास घुले खून प्रकरणात आणखी एका आरोपीला पोलिसांनी रविवारी लातूर येथून अटक केली आहे. आता यामध्ये १० आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. घुले खून प्रकरणी रामेश्वर गायकवाड, बाबासाहेब कदम, मंगेश कदम, संतोष कदम, सूरज उर्फ भैय्यासाहेब कदम, शुभम गायकवाड,नवनाथ कदम, दीपक कदम, अजय कदम या नऊ जणां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजकुमार मोरे (रा. सोनीजवळा ता. केज) यास लातूर येथून रविवारी दुपारी अटक केली आहे.
पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने फसवणूक – सविस्तर बातमी
खून प्रकरणात १० आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, हत्येच्या निषेधार्थ टाकळी येथे कँडल मार्च काढला विलास घुले यांच्या घरापासून रविवारी सायंकाळी ७ वाजता कँडल मार्चला सुरुवात झाली. ज्या ठिकाणी घुले यांची हत्या झाली, या घटनास्थळापर्यंत हा कँडल मार्च काढण्यात आला. कँडल मार्चमध्ये घुले कुटुंब, गावातील महिला व पुरुष हातात पेटत्या मेणबत्त्या घेऊन सहभागी झाले होते.
दोघांच्या पोलीस कोठडीत वाढ विलास हत्या प्रकरणात सुरुवातीला अटक केलेल्या बाबासाहेब कदम, संतोष कदम या दोघांना न्यायालयाने २८ जून पर्यंत पोलीस कोठडी दिली होती. त्यांची पोलीस कोठडी संपल्याने रविवारी या दोघांना न्यायालया समोर हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने दिली आहे.























