केज बसस्थानकातून पत्रकाराची दुचाकी चोरीला

गाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगड

केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) -मोटार सायकल चोरट्यांनी उच्छाद मांडला असून चोरट्यांनी बस स्थानकातून पत्रकाराची मोटार सायकल चोरून केल्याची घटना समोर आली आहे.मात्र चोरटा हा बस स्थानकातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिस त्याच्या मागावर आहेत. दि.१४ जानेवारीला पत्रकार महादेव काळे यांनी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांची मोटार सायकल क्र. (एम एच४४/आर०९९२) ही केज येथील बसस्थानक आवारातील क्रांती बुक स्टॉल समोर उभी करून ते कामानिमित्त बाहेर गेले होते . त्यानंतर अवघ्या दहा मिनिटात ते परत आले त्यावेळी त्यांची मोटार सायकल त्याठिकाणी नव्हती. कोणीतरी चोरट्यांनी दुचाकीचे हॅण्डल लॉक तोडून मोटार सायकल चोरून नेली.

अल्पवयीन पीडितेचा २४ तासात पोलिसांनी लावला शोध – सविस्तर बातमी 

याप्रकरणी महादेव काळे यांच्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात मारी ऊर्फ जुबेर मुस्ताक फारोकी (रा. केज जि. बीड) आणि एक अनोळखी या दोघांच्या विरुद्ध केज पोलिस ठाण्यात गु.र.नं.२१/२०२६ भा.न्या.सं.३०३, ३(५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल महावीर सोनवणे हे करीत आहेत. पोलिसांकडून दुचाकी चोराचा शोध सुरु असून बसस्थानक परिसरातील अन्य सीसीटिव्ही फुटेजही तपासले जाण्याची शक्यता आहे. बस स्थानक परिसरात पोलीस चौकी असताना असे चोरीचे प्रकार घडत असल्याने याला आळा कधी बसणार आणि होणाऱ्या चोऱ्याचे प्रकाराला जबाबदार कोण असे सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×