Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

लोकभावना लक्षात घेऊनच कस्तुरबा आणि आंबेडकर वसाहतीचा विकास करणार

लोकभावना लक्षात घेऊनच कस्तुरबा आणि आंबेडकर वसाहतीचा विकास करणार

प्रभाग क्रमांक ८ मध्ये  सनी निम्हण यांचा जोरदार प्रचार

marathinews24.com

पुणे – महापालिका निवडणुकीच्या प्रचारात रंगत येत आहे. औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे उमेदवार चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांचा प्रचार जोरदार सुरू असून त्यांनी मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिल्याचे दिसते. भारतीय जनता पक्ष विकास करताना लोकांसोबत असतो यामुळे लोकांच्या भावना समजून घेऊनच कस्तुरबा आणि डॉ. आंबेडकर वसाहतीचा विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपाशी दोन हात करण्याची ताकद वंचित बहुजन आघाडीकडेच – सविस्तर बातमी 

या प्रसंगी प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप–रिपाइं (आठवले) युतीचे उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड, सपना छाजेड यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

निम्हण यांच्या प्रचारानिमित्त औंध परिसरात पदयात्रा काढून नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. ही पदयात्रा कस्तुरबा वसाहत,जगदिश नगर,कांबळे वस्ती,संजय गांधी वस्ती,स्पायसर वस्ती या भागात काढण्यात आली होती.

यावेळी मतदारांशी संवाद साधताना चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण म्हणाले, झोपडपट्टी भागांचा विकास करताना तिथे एसआरए करायचं किंवा नाही हे स्थानिक नागरिकांनी ठरवायचे आहे. भाजप हा नेहमी स्थानिक नागरिकांना लोकांच्या भावना समजून घेऊन विकास करण्यावर भर देतो. यामुळे वस्ती विभागात सुधारणा करताना, सोई सुविधा पुरवताना विचारात घेऊ असे त्यांनी नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×