Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

कात्रज बाह्यवळण मार्गावर ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

अपघातानंतर ट्रक चालकाला अटक

marathinews24.com

पुणे – भरधाव ट्रकच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर घडली. या प्रकरणी ट्रक चालकाला आंबेगाव पोलिसांनी अटक केली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही. तरुणाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष असून, तो फिरस्ता असावा, असा संशय पोलसांनी व्यक्त केला. या प्रकरणी ट्रक चालक विठ्ठल चांदराव गायकवाड (वय ३८, रा. पुरकी, चिमकी फाटा, चाकण, जि. पुणे, मूळ रा. किनाळा, जि. नांदेड ) याला अटक करण्यात आली. याबाबत पोलीस शिपाई नागेश कोळी यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हडपसर परिसरात घरफोडी; कुलूप तोडून दागिने लांबविले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावरुन २७ जुलै रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास भरधाव ट्रक निघाला होता. चारभुजा मार्बल दुकानासमोर भरधाव ट्रकने पादचारी तरुणाला धडक दिली. अपघातात तरुण गंभीर जखमी झाला. गस्त घालणाऱ्या पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने तरुणाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही. त्याची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. ट्रक चालकाला अटक करण्यात आली असून, सहायक पोलीस निरीक्षक फिरोज मुलाणी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×