Breking News
Mahatma Jyotirao Phule : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचे द्विशताब्दी जयंती वर्ष विविध उपक्रमांनी साजरे करण्याचे आवाहनKharadi Bypass Robbery Case : पादचारी जेष्ठेच्या अंगावर पाणी उडवून लुटलेLost Mobile Recovery : वाघोली पोलिसांनी तक्रादारांच्या चेहर्‍यावर फुलवले हसूPune Crime News : पुण्यात पार्किंगच्या वादातून हाणामारीच्या घटनाBopdev Ghat Car Accident : बोपदेव घाटात वाहनाच्या धडकेत मोटार दरीत कोसळलीSugarcane Transport Safety Rules : साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीसाठी आरटीओचे सुरक्षा नियमPune Election 2026 : पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान साहित्य घेऊन पथके मतदान केंद्रांकडे रवानाPune Crime News : खुनाच्या प्रयत्नात ५ वर्षांपासून फरार आरोपीला बेड्याPune Domestic Harassment Cases : कौटुंबिक छळामुळे पुण्यात दोन महिलांनी केली आत्महत्याSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध जनजागृतीपर उपक्रम

Khadki Railway Underpass : खडकी रेल्वे स्थानकाजवळ भुयारी मार्ग उभारण्याची उपमहापौर परशुराम वाडेकर यांची मागणी

Khadki Railway Underpass : खडकी रेल्वे स्थानकाजवळ भुयारी मार्ग उभारण्याची उपमहापौर परशुराम वाडेकर यांची मागणी

जुना अरुंद बोगदा अपुरा असल्याने प्रशस्त अंडरपास उभारण्याची मागणी

marathinews24.com

पुणे – Khadki Railway Underpass : खडकी रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोडविण्यासाठी रेल्वे फाटकाजवळ नवीन प्रशस्त भुयारी मार्ग (अंडरपास) उभारण्याची मागणी उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पुणे महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन प्रशासकीय मान्यता देण्याची मागणी केली आहे. तसेच या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांनाही निवेदन देण्यात आले आहे.

चाकण-हिंजवडी परिसरातील कामाबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून आढावा – सविस्तर बातमी

या बाबत संबंधितांना  दिलेल्या पत्रात उपमहापौर वाडेकर यांनी म्हटले आहे की, खडकी रेल्वे स्थानक हे सध्या महत्त्वाचे जंक्शन झाले असून दररोज अनेक एक्स्प्रेस गाड्या येथे थांबतात. अलीकडे उत्तर भारतात जाणाऱ्या काही रेल्वेगाड्या या पुणे स्टेशन ऐवजी खडकी येथून सोडल्या जात आहेत त्यामुळे स्थानक परिसरात प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. रेल्वे स्थानकाजवळील जुने रेल्वे फाटक बंद असताना औंध, सांगवी, बाणेर, बोपोडी, खडकी बाजार आदी भागांतून ये-जा करणाऱ्या हजारो नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.

खडकी पोलिस स्टेशनजवळील जुना रेल्वे बोगदा अत्यंत अरुंद असून या मार्गावर सतत पाणी साचत असल्याने वाहतुकीस मोठ्या अडचणी निर्माण होतात. Khadki Railway Underpass वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या लक्षात घेता हा बोगदा दुरुस्त करूनही वाहतुकीची समस्या कायम राहण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर खडकी रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे फाटकाच्या ठिकाणी नवीन प्रशस्त भुयारी मार्ग उभारण्यासाठी तातडीने प्रशासकीय मान्यता द्यावी, तसेच रेल्वे प्रशासनास पत्र पाठवून संयुक्त पाहणी करावी, अशी मागणी वाडेकर यांनी केली आहे. या कामासाठी आवश्यक अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×