दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – शहरातील खराडी गावठाणातून तरुणाला कारमध्ये जबरदस्तीने घालून त्याचे अपहरण करण्यात आले. जिवे मारण्याची धमकी देत बेल्ट आणि काठीने मारहाण करून त्याला जखमी केल्याप्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी शुभम नामदेव खवळे (वय २०), साई नामदेव खवळे (वय १८, दोघे रा. हडपसर), सतरा वर्षांचा विधीसंघर्षित बालक आणि त्यांचे सात मित्र, यांच्यावर खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत श्लोक प्रमोद मोरे (वय १९, रा. खराडी गावठाण, मूळ रा. राजेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.
आईस्क्रीम देण्यासाठी गेलेल्या तरुणावर हत्याराने हल्ला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता खराडी गावठाणातील बुद्ध विहारासमोर ही घटना घडली. आरोपी पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून आले. त्यांनी संगनमत करून मोरे यांना जबरदस्तीने कारमध्ये घातले. जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांचे अपहरण केल्याचा आरोप फिर्यादीत आहे. त्यानंतर शिवीगाळ करून त्यांना ठार मारण्याची भाषा केली. कमरेच्या बेल्टने आणि काठीने मारहाण करून मोरे यांना जखमी करण्यात आले. दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी याप्रकरणाची नोंद झाली.
नऱ्हेत घरफोडी; शॉर्टसर्किटने साहित्य जळाले
नऱ्हे येथील बंद फ्लॅटच्या दरवाजाचा कोयंडा तोडून चोरट्याने दहा हजार रुपयांची रोकड लंपास केली. याच फ्लॅटमध्ये लाईट लावल्यामुळे शॉर्टसर्किट होऊन स्वयंपाकघरातील उपकरणे, भांडी आणि कपडे जळाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर नऱ्हे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अथर्व जितेंद्र महाडीक (वय २५, रा. फ्लॅट क्रमांक १०१, चंदन हाईट्स, श्री कंट्रोल चौकाजवळ, नऱ्हे,) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ या कालावधीत महाडीक यांच्या राहत्या फ्लॅटमध्ये चोरी झाली. चोरट्याने दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून दहा हजार रुपयांची रोकड चोरून नेली. अहवालानुसार, घरातील लाईट लावल्यामुळे शॉर्टसर्किट झाले. त्यात किचनमधील फ्रिज, हिटर, मिक्सर, प्लास्टिकची भांडी आणि कपडे जळून नुकसान झाले. चोरीसह घरातील वस्तू जळाल्याचा तपशीलही फिर्यादीत नमूद आहे. पोलिस हवालदार सूर्यवंशी तपास करीत आहेत.






















