Breking News
मोबाईल न विचारता वापरला, वादातून तरुणाचा खूनअण्णा भाऊ साठे यांचे साहित्य विश्वात्मक मानदंड निर्माण करणारे-डॉ. श्रीपाल सबनीससोमनाथ सूर्यवंशी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल…पुण्यातून अपहरण केलेल्या २ वर्षाच्या चिमुकलीची सुटकालोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वाहतुकीत बदलसाहित्यरत्न लोकशातिर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीच्या पूर्वसध्येला समाजरत्न पुरस्कार समारंभपुण्यात १२ हजार ७५० विद्यार्थ्यांना मिळणार ‘अंकनाद गणित सात्मीकरण प्रणालीबालमैत्रीपूर्ण आश्रमशाळा उपक्रम आदिवासी मुलांसाठी संरक्षणात्मक वातावरण करण्यास उपयुक्त-प्रदीप देसाईखराडी पार्टी प्रकरणात पोलिसांची कारवाई एकतर्फीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना; यवतमध्ये ३१ जुलैला रस्ता रोको

लोहगावमध्ये गांजा विक्री करणार्‍या मजूराला अटक

लोहगावमध्ये गांजा विक्री करणार्‍या मजूराला अटक

१२ किलो गांजा जप्त

marathinews24.com

पुणे Crime News लोहगाव परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ३ लाख रुपयांचा १२ किलो गांजा जप्त करण्यात आला. अखिलेश गरीब मंडल (वय ३४, रा. लोहगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लोहगावमधील कर्मभूमीनगर परिसरात एकजण थांबला असून त्याच्याकडे गांजा असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांना मिळाली. त्यानंतर तपात पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

पुण्यात भाजप पदाधिकार्‍यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल; महिला पोलीस अधिकार्‍याशी अश्लील वर्तन – सविस्तर बातमी 

अंगझडतीत अखिलेश मंडळ याच्या कापडी पिशवीत १२ किलो गांजा सापडला, जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत तीन लाख रुपये आहे. मंडल हा बांधकाम मजूर आहे. त्याने गांजा कोठून आणला, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस कर्मचारी रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे आणि पथकाने ही कारवाई केली. दोन दिवसांपूर्वी येरवडा भागात गांजा विक्री प्रकरणात एका तरुणाला अटक करण्यात आली होती.

अमली तस्करांविरूद्ध कठोर कारवाई करा-पोलीस आयुक्त

अमली पदार्थांची विक्री करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. अमली पदार्थ विक्री प्रकरणात अटक करण्यात आलेले विक्रेत्यांची चौकशी करुन अमली पदार्थांचा पुरवठा करणार्‍यांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता कारवाईचा वेग वाढविण्यात आला आहे.

सिंहगड रस्ता भागात दुचाकी चोरट्यांना पकडले, २ दुचाकी जप्त

Crime News : दुचाकी चोरणार्‍या चोरट्यांना नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. ओंकार संतोष सातपुते (वय २०, रा. लायगुडे वस्ती, धायरी), साईराज अतुल तावरे (वय १८, रा. कांबळे वस्ती, धायरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. धायरी परिसरातून दोन दुचाकी चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुचाकी चोरट्यांच्या मागावर पोलिसांचे पथक होते.

सराइत चोरटे सातपुते आणि तावरे यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे केल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी मोहन मिसाळ आणि शिवा क्षीरसागर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना पकडले. चौकशीत दोघांनी दुचाकी चोरीची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड सिटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, सहायक निरीक्षक राहुल यादव, मिसाळ, क्षीरसागर, राजू वेगरे, उत्तम शिंदे, स्वप्नील मगर, निलेश कुलथे, संग्राम शिनगारे यांनी केली.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top