Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

खेलो इंडिया कुस्‍ती आखाड्यात मजुराच्‍या मुलाला रौप्‍य

खेलो इंडिया कुस्‍ती आखाड्यात मजुराच्‍या मुलाला रौप्‍य

अजय ठरला महाराष्ट्राचा एकमेव पदक विजेता कुस्‍तीगीर

marathinews24.com

जयपूर – खेलो इंडिया विद्यापीठ स्‍पर्धेतील कुस्‍ती प्रकारात महाराष्ट्राने निराशाजनक कामगिरी प्रदर्शन घडवले. पुरूष गटात मजुरचा मुलगा असणाऱ्या अजय निंबाळकरने ग्रीको रोमन 55 किलो गटात रौप्‍य तर सृष्टी भोसले व समृध्दी घोरपडे यांनी कांस्य पदकाची कमाई केली आहे. पुरूषांच्‍या गटात पदक विजेता ठरलेला अजय हा महाराष्ट्राचा एकमेव कुस्‍तीगीर ठरला आहे.

वेदश्री तपोवन मोशी येथे गीता जयंती महोत्सवाला राज्यपाल आचार्य देवव्रत यांची उपस्थिती – सविस्तर बातमी 

भरतपूर (राजस्थान) येथे संपलेल्‍या कुस्‍ती स्‍पर्धेत ग्रीको रोमन 55 किलो गटात अजय निंबाळकरने अंतिम फेरीत मजल मारून चमकदार कामगिरीचे प्रदर्शन घडवले. आक्रमक खेळ करीत सलामीच्‍या फेरीत जळगावच्‍या धनराज सोनवणेवर ८-० केली. दुसऱ्या फेरीत चौधरी देवी लाल विद्यापीठाच्‍या अभिषेकला ८-० केले. उपांत्‍य फेरीत अजमेर विद्यापीठाच्‍या दिपक कुमारला १३-५ हरवून अंतिम फेरीत मजल मारली होती. सुवर्णपदकाच्‍या लढतीत गुणांवर कुरुक्षेत्र विद्यापीठाच्‍या मनीषकुमारने ८-५ गुणांवर अजय निंबाळकरला पराभूत केले.

इंदापूरमधील श्री छत्रपती कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शिकणाऱ्या अजयचे वडिल साहेबराव निंबाळकर हे मजुर आहेत. त्‍याचे आई, वडिल, भाऊ व आजी हे मारीआई देवींचे काम करत असतात. पंटू पवार, किरण शितोळे यांनी खुराकाला मदत केल्‍याने व तालमीत मोफत सुविधांच्‍या जोरावर तो राष्ट्रीय कुस्‍तीपटू घडला आहे. काका पवार यांच्‍या मार्गदर्शनाखाली तो पुण्यात आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात सराव करीत असतो.

महिलांच्‍या कुस्‍ती लढतीत शिवाजी विद्यापीठाच्‍या मुली चमकल्‍या. फ्री स्टाइल कुस्तीच्या 53 किलो वजन गटात समृद्धी घोरपडेने 65 किलो वजन गटांत सृष्टी भोसलेने कांस्य पदकाची कमाई केली. कोल्‍हापूरातील कागल तालुक्‍यातील सृष्टी भोसलेने कांस्य पदकाच्‍या लढतीत पंजाब विद्यापीठाच्‍या खेळाडूवर मात केली. सृष्टी शाहू कारखान्याचे मानधनधारक खेळाडू आहे.

खेलो इंडिया विद्यापीठ स्‍पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पदकतक्‍यात ६ व्‍या स्‍थानावर आहे. ६ सुवर्ण, ११ रौप्‍य व ९ कांस्य अशी २६ पदकांची कमाई पुणे विद्यापीठाने केली आहे. शिवाजी विद्यापीठाने २ सुवर्ण, २ रौप्‍य व ७ कांस्यपदके पटकावून १४ व्‍या स्‍थानावर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ५ तर ५५ व्‍या तर मुंबई विद्यापीठ ४ पदकांसह ५६ व्‍या स्‍थानावर आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×