सचिवपदी दिपक कसबे यांची निवड
marathinews24.com
पुणे – महापालिका व पुणे शहर जिल्हा मातंग समाज यांच्या समन्वयातून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती सारसबाग परिसरात विविध कार्यक्रमाद्वारे दरवर्षी आयोजित केली जाते. यावर्षीच्या आयोजनाबाबत पुणे शहर जिल्हा मातंग समाजाची नुकतीच बैठक पार पडली असून, स्वागताध्यक्षपदी लक्ष्मीताई पवार तर सचिवपदी दीपक कसबे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे मातंग समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे .
ऋतूगंध’ संगीताविष्काराने रसिक मंत्रमुग्ध – सविस्तर बातमी
लक्ष्मीताई पवार या गेल्या २५ वर्षापासून दलित व महिलांच्या हक्कांसाठी कार्य करीत आहेत. सध्या त्या दलित महासंघाच्या राज्य उपाध्यक्षा आहेत तर दीपक कसबे हे गेल्या १० वर्षापासून सामाजिक कार्य करीत आहेत .१ ऑगस्ट ला होणाऱ्या अण्णा भाऊ साठे जयंतीचे यावर्षीचे वैशिष्ठे म्हणजे इतिहासात पहिल्यांदाचं स्वागताध्यक्ष पदी महिलेची निवड होत आहे.
यावेळी दलित चळवळीचे मार्गदर्शक बैठकीचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, अंकल सोनावणे होते. माजी मंत्री रमेश दादा बागवे,माजी सभागृह नेते व राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुभाष जगताप,, माजी नगरसेवक अविनाश बागवे,अनिल हातागळे ,विकास सातारकर, संजय केंदळे, सचिन जोगदंड, दत्ता जाधव, रवी आरडे, सुनील खंडागळे, माजी नगरसेवक शांतीलाल मिसाळ, ॲड. राजश्री अडसूळ, व पुणे शहर जिल्ह्यातील विविध पक्ष,संघटनाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .