Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

स्पर्धा मार्गावरील सुरक्षिततेच्यादृष्टीने सूक्ष्म नियोजन करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

स्पर्धा मार्गावरील सुरक्षिततेच्यादृष्टीने सूक्ष्म नियोजन करा- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

१९ ते २३ जानेवारीदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

marathinews24.com

पुणे – ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये पोलीस, आरोग्य, रस्ते विभागाची महत्वपूर्ण भूमिका आहे. स्पर्धा मार्गावरील रस्ते स्वच्छ व सुरक्षित असणे आवश्यक आहेत. आरोग्य विभागाने स्पर्धा मार्गावर आवश्यक पथके तयार ठेवावीत. पोलीस विभागाने बंद वाहतूक मार्ग व पर्यायी मार्गांबाबत जनजागृती करावी, मार्गावर दूर्घटना होण्याची शक्यता निर्माण होणार नाही यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

दादा… तुम्ही गरीब मुलींची फी माफ करुन अतिशय उत्तम काम केले! – सविस्तर बातमी 

जिल्ह्यात १९ ते २३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या अनुषंगाने सर्व विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धेचे संचालक पिनाकी बैसाक तसेच जिल्ह्यातील कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डुडी पुढे म्हणाले, आरोग्य विभागाने पथके तैनात असलेल्या ठिकाणापासून आजूबाजूच्या २५ कि.मी. परिसरातील सर्व आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध असणाऱ्या दवाखान्यांची माहिती घ्यावी. रस्त्यांचे डीप क्लिनींग करावे, मार्गावरील रत्स्यांवर माहिती देणारे चिन्ह लवकरात लवकर लावावेत. ग्रामीण भागात स्पर्धा मार्गावर जनावरे येणार नाहीत यासाठी पशुसंवर्धन, वनविभाग, ग्रामपंचायत व स्वयंसेवकांची पथके तयार करुन गावांगावांत जनजागृती करावी. १२ व १८ जानेवारीला स्पर्धेचे मॉकड्रिल घेण्यात येणार असून त्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण पोलीस विभागाने समन्वयाने नियोजन करुन मार्गनिश्चिती करावी. ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम घ्यावी. तसेच गावांगावात चांगल्या पद्धतीने स्वागत होईल याचे नियोजन करावे. शिक्षण आणि क्रीडा विभागाने आवश्यक स्वयंसेवकांचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे नियोजन करावे, अन्न व औषध प्रशासनाने मार्गावरील पदार्थांचा दर्जा तपासून घ्यावा, अशा सूचनाही श्री. डुडी यांनी दिल्या.

बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे, पिंपरी चिंचवड, पुरंदर, बारामती, पोलीस विभाग, आरोग्य, क्रीडा, वन, पर्यटन,अन्न व औषध प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महानगरपालिका यांच्यावतीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती घेण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×