Breking News
Sahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Pune Shivajinagar Court Bomb Threat : शिवाजीनगर न्यायालयासह मेट्रो स्थानकात बाँम्बची धमकी

Pune Shivajinagar Court Bomb Threat

न्यायालयीन कामकाजावर परिणाम

marathinews24.com

पुणे – Pune Shivajinagar Court Bomb Threat : शहरातील शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय, तसेच मेट्रो स्थानकात बाँम्ब ठेवल्याची धमकी देणारा ईमेल सोमवारी पाठविण्यात आल्यानंतर घबराट उडाली. दुपारी अडीचच्या सुमारास न्यायालयाच्या अधिकृत ईमेलवर धमकीचा संदेश पाठविण्यात आला. सुरक्षेचा उपाय म्हणून न्यायालयीन कामकाज तातडीने थांबविण्यात आले. पोलिसांनी शिवाजीनगर न्यायालयात धाव घेतली. बाॅम्ब शोधक नाशक पथकाने शिवाजीनगर न्यायालय, तसेच मेट्रो स्थानक परिसराची कसून तपासणी केली. तेव्हा बाँम्बसदृश वस्तू सापडली नाही.

तरुणाला गॅस कनेक्शन बंद करण्याची बतावणी, ६ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी 

शिवाजीनगर न्यायालयातील अधिकृत ईमेलवर सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास ईमेल पाठविण्यात आला. शिवाजीनगर न्यायालय, तसेच मेट्रो स्थानक बाँम्बने उडवून देण्याच धमकी ईमेलद्वारे देण्यात आली होती. त्यानंतर त्वरीत या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. शिवाजीनगर न्यायालयातील कर्मचारी, तसेच बाँम्ब शोधक नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. (Pune Shivajinagar Court Bomb Threat) न्यायालयाचा परिसर मोकळा करण्यात आला. न्यायाधीश, कर्मचारी न्यायालायच्या आवारातील अशोक हाॅल परिसरात जमले. बाँम्बशोधक पथकाने संपूर्ण परिसराची तपासणी केली. तेव्हा बाॅम्बसदृश वस्तू आढळून आली नाही. घटनेनंतर शिवाजीनगर न्यायालयासमोरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

धमकीच्या ईमेलमुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाला. सोमवारी सुनावणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या प्रकरणांची सुनावणी झाली नाही. संबंधित प्रकरणांना पुढील तारीख देण्यात आली. ‘धमकीचा ईमेल पाठविण्यात आल्यानंतर त्वरीत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासणी सुरू केली. सुरक्षेच्या कारणास्तव सायंकाळपर्यंत तपासणी सुरू होती’, असे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर यांनी सांगितले. पोलिसांनी शिवाजीनगर मेट्रो स्थानक परिसराची तपासणी केली.

राज्यातील अन्य न्यायालयात धमकीचा ईमेल

पुण्यासह राज्यातील अन्य न्यायालायत धमकीचा ईमेल पाठविण्यात आल्याची माहिती चौकशीत मिळाली. एकाच वेळी राज्यातील विविध शहरात धमकीचा ईमेल पाठविण्यात आले. ईमेल पाठविणाऱ्याचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांकडून तांत्रिक तपास सुरू करण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×