एमएनजीएल कंपनीतून बोलत असल्याची बतावणी; APK फाईल पाठवून मोबाइल हॅक, विश्रांतवाडीतही साडेतीन लाखांची फसवणूक
marathinews24.com
पुणे – Pune Cyber Crime News ; एमएनजीएल गॅस कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करत सायबर चोरट्याने एकाला संपर्क साधला. गॅस कनेक्शन अपडेट करुन न घेतल्यास कनेक्शन बंद होण्याची बतावणी केली. त्यानंतर संबंधिताने तक्रारदाराला एपीके फाईल पाठवून त्यांच्याकडील माहिती समाविष्ट करण्यास भाग पाडले. त्यानंतर बँकखात्याचा ताबा घेउन ऑनलाईनरित्या तब्बल ६ लाख २२ हजारांची गंडा घातला. ही घटना १८ ऑगस्टला आंबेगाव बुद्रूक परिसरात घडली आहे. याप्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
दिवाळीनिमित्त खरेदी करणाऱ्या महिलांच्या पिशवीतून रोकड लंपास – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे आंबेगाव परिसरात राहायला असून, १८ ऑगस्टला सायबर चोरट्याने त्यांना संपर्क साधला. एमएनजीएल कंपनीच्या कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी केली. गॅस कनेक्शन अपडेट न केल्यास गॅस पुरवठा बंद करण्याची धमकी दिली. त्यानंतर सायबर चोरट्याने तक्रारदाराच्या मोबाईल वर एपीके फाईल पाठवली. त्यावर तक्रारदाराला माहिती भरण्यास भाग पाडून त्यांना मोबाइल हॅक केला. त्यानंतर सायबर चोरट्याने तक्रारदाराच्या बँकखात्यातून तब्बल ६ लाख २२ हजार रुपये ऑनलाईनरित्या वर्ग करुन घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक इंगळे तपास करत आहेत.
बँक खात्यातून साडेतीन लाखांची ऑनलाईन फसवणूक
तरुणाच्या बँकखात्यातून तब्बल ३ लाख ६५ हजार रुपये ऑनलाईनरित्या दुसर्या खात्यात वर्ग करुन फसवणूक करण्यात आली. ही घटना २५ ऑक्टोबरला विश्रांतवाडीत घडली असून, याप्रकरणी तरुणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. Pune Cyber Crime News त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या बँक खात्यातून ऑनलाईनरित्या पैसे कमी झाल्याचा मेसेज आल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संपतराव राउत तपास करत आहेत.
























