Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

दिवाळीनिमित्त खरेदी करणाऱ्या महिलांच्या पिशवीतून रोकड लंपास

तुळशीबागेत महिलेचे दीड लाखांचे दागिने चोरी

पुण्यातील मध्यवर्ती भागात घटना

marathinews24.com

पुणे – दि‌वाळीनिमित्त मध्य भागात खरेदीसाठी आलेल्या दोन महिलांच्या पिशवीतून रोकड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. शनिपार आणि तुळशीबाग परिसरात घटना घडल्या. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शनिपार चौक परिसरात रविवारी (१ नाेव्हेंबर) दुपारी साडेचारच्या सुमारास खरेदी करणाऱ्या महिलेच्या पिशवीतून सात हजार रुपयांची रोकड लांबविण्यात आली. याबाबत महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात ऐन दिवाळीत चोरट्यांचा धुमाकूळ – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मार्केट यार्ड भागातील गंगाधाम परिसरात एका सोसायटीत राहायला आहेत. दिवाळीनिमित्त त्या रविवारी तुळशीबाग परिसरात खरेदीसाठी आल्या होत्या. शनिपार चौकात खरेदी करत असताना गर्दीत महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी सात हजार रुपयांची रोकड लांबविली. पोलीस हवालदार कदम तपास करत आहेत.

तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी १४ हजार ७८८ रुपये लांबविल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला पुणे स्टेशन परिसरातील प्रायव्हेट रोड भागात राहायला आहेत. त्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरातून तुळशीबागेत खरेदीसाठी निघाल्या होत्या. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गर्दीत चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतून रोकड, अमेरिकन डाॅलर असा मुद्देमाल लांबविला. रोकड चोरीला गेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार गोंजारी तपास करत आहेत.

तुळशीबाग, मंडई परिसरात दिवाळीत खरेदीसाठी मोठी गर्दी होते. शहर, तसेच उपनगरातून मोठ्या संख्येने नागरिक खरेदीसाठी गर्दी करतात. सणासुदीच्या काळात महिलांकडील दागिने, रोकड लांबविण्याच्या घटना वाढतात. या भागात पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×