Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

पालखी सोहळ्यावेळी हरवलेल्या महिलेची दिंडी प्रमुखासोबत घडवली भेट

पालखी सोहळ्यावेळी हरवलेल्या महिलेची दिंडी प्रमुखासोबत घडवली भेट

मार्केटयार्ड पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – पालखी सोहळ्यात हरवलेल्या जेष्ठ महिलेची संबंधित दिंडी प्रमुखासोबत भेट घडवून देत मार्केटयार्ड पोलिसांनी जबाबदारीचे दर्शन घडवले आहे. दरवर्षी लाखो वारकरी पायी पंढरपूरला जाण्यासाठी पुण्यातून मार्गस्थ होतात. शुक्रवारी (दि. २०) पुण्यात संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन झाले. यावेळी शेकडो दिंड्या शहरात मुक्कामी आल्या आहेत. त्यापैकी दिंडीतील एक महिला वारकरी तिच्या दिंडीपासून चुकली होती. संबंधित वारकरी महिलेला मार्केटयार्ड पोलिसांनी सुखरूप दिंडी प्रमुखांच्या ताब्यात दिले.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवाद वारी’ प्रदर्शनाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उद्घाटन – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने शहरात सर्वत्रच चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मार्केटयार्ड पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनिषा पाटील पथकासह पेट्रोलिंग करत होत्या. त्यावेळी एक महिला घाबरलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आली. त्यांची पोलिसांनी विचारपूस केली असता, त्या महिलेने दिंडीमध्ये आल्याचे सांगत, चुकल्याचे सांगितले. सीमा दत्तात्रय ठाकूर ( वय ५५, रा. दसखार, भटआळी) असे नाव महिलेने पोलिसांना सांगितला. मात्र, त्यांच्याकडे कुणाचाही मोबाईल नंबर नसल्याने सविस्तर माहिती देणे महिलेला शक्य नव्हते.

त्यामुळे मार्केटयार्ड पोलिसांनी उरण पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. उरण पोलिसांनी संबंधित महिलेच्या पतीचा व दिंडी प्रमुखाचा नंबर मिळवून तो मार्केटयार्ड पोलिसांना दिला. पोलिसांनी लगेच दिंडी प्रमुखाला फोन करत संबंधित महिलेबाबत माहिती देत, त्यांना पोलिस ठाण्यात बोलवले. त्यांच्याकडे खात्री करून सीमा ठाकूर यांची दिंडी प्रमुखांची भेट घडवून आणली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×