खारघर येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी भव्य आयोजन
marathinews24.com
पुणे – खारघर येथे जाण्याकरिता गुरुद्वारा येथून बसेसची व्यवस्था करण्यात आली असून सिंधी समाजातील अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमासाठी यावे, असे आवाहन भारतीय सिंधू सभाचे महाराष्टाचे अध्यक्ष सुरेश हेमलाणी यांनी केले.
महिला आरोग्य विषयक जनजागृती फॅशन शो संपन्न – सविस्तर बातमी
श्री. हेमनानी म्हणाले, साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त साहिबजीची शिकवणी आणि त्यांच्या हौतात्म्यची भावना भावी पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी खारघर, नवी मुंबई येथे भव्य ‘हिंद-दी-चादर’ भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
सिख, सिंधी, सिकलीगर, लबाना, बंजारा, मोहयाल आणि गुरुनानक नाम लेवा संगत- समुदायांचे गुरु साहिबांशी ऐतिहासिक संबंध असून शहीदी समागम एकत्रितपणे साजरा करीत आहेत. यादृष्टीने सिंधी समाजाचे या कार्यक्रमाकरिता संपूर्ण सहकार्य आहे, असेही श्री. हेमनानी यांनी केली आहे.























