Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

MPSC Students Protest : सरकार एमपीएससी विद्यार्थ्यांच्या हिताचाच विचार करत आहे-आमदार शंकर जगताप

MPSC Students Protest

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य झाल्याचा आमदार शंकर जगताप यांचा दावा; उर्वरित मागणीवर लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन

marathinews24.com

पुणे – MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या पुण्यामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा राज्य सरकार संवेदनशीलपणे विचार करत आहे. त्यांच्या 13 पैकी 12 मागण्या यापूर्वीच सरकारने मान्य केले आहेत . केवळ ऑब्जेक्टिव्ह च्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे. त्या संदर्भातही लवकरच तोडगा निघेल. राज्य सरकार एमपीएससी विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करत आहे, परंतु विरोधकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे भांडवल करून राजकारण करू नये असे आवाहन आमदार शंकर जगताप यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल- माजी मंत्री आत्माराम परमार – सविस्तर बातमी 

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या नवी पेठेतील अहिल्यादेवी शिक्षण संस्थे समोर सुरू असलेल्या आंदोलनाला आमदार शंकर जगताप यांनी भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली त्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींची बोलत होते. अहिल्यादेवी शिक्षण संस्थेसमोर सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन हे कोणत्याही राजकीय स्वरूपाचे आंदोलन नाही, येथील विद्यार्थी हे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून, शेताच्या बांधावरून पुण्यामध्ये शिकण्यासाठी आले आहेत. MPSC Students Protest या विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा संवेदनशील पणे विचार करून सरकारने त्यांच्या 13 पैकी 12 मागण्या यापूर्वीच मान्य केले आहेत. केवळ एका मागणीसाठी या विद्यार्थ्यांचे आंदोलन सध्या सुरू आहेत त्या संदर्भातही सरकार विचार करत आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगात मध्ये काही अनुचित प्रकार घडला, त्या संदर्भात सरकारने विशेष चौकशी समिती नेमली आहे .

सरकार या संदर्भात तत्परतेने पावले उचलत आहे. परंतु विरोधक मात्र विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे भांडवल करून आपले राजकीय हित जपण्याचा प्रयत्न करत आहेत. मी स्वतः 1997 ते 2000 सालापर्यंत एमपीएससी चा विद्यार्थी होतो. त्यामुळे सरकारचा प्रतिनिधी आणि विद्यार्थी या दोन्ही नात्याने मला एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या अडचणी माहिती आहेत. या संदर्भात मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात या संदर्भात चर्चा करणार आहे असेही आमदार शंकर जगताप यांनी यावेळी सांगितले.

एस एम जोशी पुलावर सुरू असलेले एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची मुख्य मागणी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामासाठी आहे. परंतु कायद्यानुसार ही मागणी शक्य होणार नाही. या संदर्भात विद्यार्थ्यांना आणि त्यांना पाठिंबा असणाऱ्या राजकीय व्यक्तींनाही माहिती आहे, परंतु केवळ राजकीय भांडवल करण्यासाठी हे आंदोलन केले जात आहे असेही शंकर जगताप यांनी यावेळी टीका केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×