Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

राष्ट्रीय मतदार दिन पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न

लोकशाही दैनंदिन आचरणातून जिवंत राहते – अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत

marathinews24.com

पुणे – लोकशाही ही केवळ राज्यघटनेतील संकल्पना नसून ती प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन आचरणातून जिवंत राहते. मतदानाचा अधिकार हा केवळ हक्क नसून तो प्रत्येक नागरिकाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. युवकांनी विशेषतः मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा, लोकशाही मूल्यांची जपणूक करावी आणि संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्याची जबाबदारीने कदर करावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांनी केले.

ज्ञानमंदिर कळंबोली शाळेने पटकवले ‘मएसो क्रीडा करंडक २०२६’चे विजेतेपद – सविस्तर बातमी

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित कार्यक्रमात मतदार नोंदणी व निवडणूक प्रक्रियेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, प्रमुख पाहुणे मेजर अर्चिस सबनीस, विंग कमांडर वैष्णवी टोकेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी ‘उत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी – २०२६’ हा पुरस्कार पिंपरी विधानसभा मतदारसंघातील अर्चना यादव-पोळ यांना प्रदान करण्यात आला. तसेच ‘उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी’ म्हणून जुन्नर विधानसभा मतदारसंघातील सुनिल शेळके यांचा सन्मान करण्यात आला. निवडणूक नायब तहसीलदार प्रवर्गात आंबेगाव येथील सचिन वाघ आणि शिवाजीनगर येथील सायली धस यांना पुरस्कार देण्यात आला, तर निवडणूक लिपीक प्रवर्गात शिवाजीनगर येथील अर्चना सानप यांना गौरविण्यात आले.

मतदारसंघनिहाय उत्कृष्ट पर्यवेक्षक पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले. यामध्ये जुन्नर येथील राजेंद्र अडसरे, आंबेगावचे सागर सूर्यकांत गुरव, खेडचे अनिल बोऱ्हाडे, शिरूरचे एकनाथ देवीचंद ओव्हाळ, इंदापूरचे लक्ष्मीकांत शिवाजी मुळे, बारामतीचे संतोष रामचंद्र नलवडे, पुरंदरच्या अरूणा दत्तात्रय खेडेकर, भोरचे श्री. युनूस अब्दुल शेख, भोर-मुळशीचे लवा बाबा गायकवाड, मावळच्या सौ. एम. एफ. खान, चिंचवडचे महेंद्र ज्ञानोबा पवार, पिंपरीचे राजेंद्र रामचंद्र कांगुडे, भोसरीच्या मंगल जाधव, वडगावशेरीच्या श्रीमती सोनल मंगेश बोऱ्हाडे, शिवाजीनगरच्या श्रीमती लता दामसे, कोथरुडचे दीपक कंधारे, खडकवासल्याचे रवी फनसे, पर्वतीच्या श्रीमती स्नेहल श्याम साखरे, हडपसरचे अजय सिन्नरकर, पुणे कॅन्टोन्मेंटचे डॉ. मोहम्मद जमीर अहमद चाँद शेख आणि कसबा पेठ मतदारसंघातील सौरभ मोरे यांचा समावेश होता.

याशिवाय उत्कृष्ट मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून जुन्नरचे श्री. कैलास दाभाडे, आंबेगावचे श्री. अर्जुन रामचंद्र झोडगे, खेडचे श्री. दिनेश धाकडे, शिरूरचे श्री. सचिन दिलीप कारकुड, दौंडचे सुधीर पोपट बोत्रे, इंदापूरचे मुरलीधर धनंजय माने, बारामतीचे  विजय तुकाराम चव्हाण, पुरंदरचे आदिनाथ भागवत, भोरचे सूर्यकांत काशिनाथ बारवकर, भोर-मुळशीचे मयुर बाळासाहेब कळमकर, मावळचे महादेव शेलार, चिंचवडचे अनिल नारायण सुकाळे, पिंपरीचे सुधीर मारुती खाडे, भोसरीच्या श्रीमती रजनी दळवी, वडगावशेरीचे रविंद्र देवराम गारे, शिवाजीनगरचे रामदास गवारी, कोथरुडचे धर्मराज आंग्रे, खडकवासल्याचे गणेश कारले, पर्वतीच्या अर्चना प्रशांत मोरे, हडपसरच्या श्रीमती रेश्मा ढमढेरे, पुणे कॅन्टोन्मेंटच्या श्रीमती बिंदू नायर आणि कसबा पेठच्या श्रीमती चित्रा पवार यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या वेळी मतदार जनजागृतीसाठी उपस्थितांना मतदार प्रतिज्ञा देण्यात आली. तसेच वासुदेव आसाराम कसबे यांनी सादर केलेले मतदार जनजागृती गीत उपस्थितांच्या मनाला भिडले.

यावेळी प्रमुख पाहुणे मेजर अर्चिस सबनीस, विंग कमांडर वैष्णवी टोकेकर यांनीही लोकशाही मध्ये मतदाराच्या महत्व विशद केले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी राष्ट्रीय मतदार दिन का केला जातो याचे महत्व आपल्या प्रास्ताविकात विशद केले.

राष्ट्रीय मतदार दिना निमित्त चित्र प्रदर्शन

भारतीय लोकशाही मध्ये मतदाराचे महत्व विशद करणारे अत्यंत सुंदर असे प्रदर्शन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तळ मजल्या वरील विस्तृत अशा जागेत लावले आहे. आज राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमाला आलेल्या नवमतदार युवक, युवतीनीं हे प्रदर्शन पाहिले… आपले मतदान किती अमूल्य आहे याची जाणीव झाल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी दिल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×