Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

३० सेकंदापेक्षाही जास्त उशीर नाही! जपानच्या ट्रेनचं जगभर कौतुक…

३० सेकंदापेक्षाही जास्त उशीर नाही! जपानच्या ट्रेनचं जगभर कौतुक...

केवळ प्रगत तंत्रज्ञानच नाही तर संस्कृती आणि शिस्त प्रिय देश म्हणून जपानची जगभर ओळख

marathinews24.com

पुणे प्रतिनिधी (रेवण कोळेकर) – ‘उगवत्या सूर्याचा देश’ म्हणून जपानची जगभर ओळख आहे. हा देश आपल्या प्रगत तंत्रज्ञाना बरोबरच अनोखी संस्कृती, शिस्त आणि लोकांच्या अविश्वसनीय कार्यक्षमतेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. पण तुम्ही जपानची एक गोष्ट ऐकून नक्कीच थक्क व्हाल, ती म्हणजे तेथील होणारे वेळेचे पालन, जपान या देशात ३० सेकंदापेक्षाही ट्रेन उशीर करत नाही.

भारतीय सैनिक सीमावर्ती भागात करणार दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना – सविस्तर बातमी 

जपान देशातील लोक वेळेला किती महत्व देतात हे तेथील रेल्वे प्रशासनावर स्पष्ट होते. जपानमध्ये धावणाऱ्या बुलेट ट्रेनसह इतर सर्व ट्रेन या सरासरी ३० सेकंदापेक्षा जास्त उशीर करत नाहीत. एखादी ट्रेन काही कारणास्तव उशिरा धावली तर रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची जाहीर माफी मागितली जाते, आणि तसे प्रमाणपत्र ही दिले जाते, जेणेकरून प्रवाशांना कामावर गेल्यानंतर उशीर का झाला हे कारण सांगता येईल. वेळेवर प्रामाणिकपणे काम करणे हे जपान देशातील लोकांचे वैशिष्ट्यच आहे.

संस्कृती बरोबरचं सामाजिक नियम देखील जपानमध्ये पाळले जातात

आश्चर्य म्हणजे जपान मधील काही सामाजिक नियम आणि परंपरा खूपच वेगळ्या आहेत. जपानमध्ये मुले १० वर्षाची होईपर्यंत कोणतीही त्यांना परीक्षा द्यावी लागत नाही. दरम्यानच्या काळात जपान मधील मुले आपलं बालपण मनसोक्त जगण्याची आणि जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी शिकण्याची त्यांना संधी दिली जाते. भारतासारख्या देशात जसे हात जोडून नमस्कार करतात तसेच जपानमध्ये आदरातिथ्य म्हणून एकमेकांना वाकून अभिवादन करण्याची पद्धत आहे. जो व्यक्ती जितका जास्त आदरणीय त्याच्यासमोर तितके जास्त वाकले जाते.

जपानमध्ये सार्वजनिक नियमांपैकी आणखी काही नियम आहेत, जसे की मोबाईलवर बोलताना मोठमोठ्याने बोलणे हे असभ्य मानले जाते. जपान मधील लोक शांतता आणि इतरांच्या सोयीचा खूप विचार करतात, स्वच्छता हा जपानी संस्कृतीचा कणा आहे. तेथील शाळेतील साफसफाई विद्यार्थी आणि शिक्षक मिळून करतात. यात स्वच्छतेच्या सवयी आणि निरोगी जीवनशैलीमुळे जपानमध्ये लोक दीर्घायुष्य असतात येथील लोकांचे सरासरी वय 82 वर्षे असून हे जगातील सर्वाधिक सरासरी व वयांपैकी एक आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×