Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

प्रवासी युवतीशी अश्लील कृत्य; रिक्षाचालक गजाआड

प्रवासी युवतीशी अश्लील कृत्य; रिक्षाचालक गजाआड

२४ तासात न्यायालयात आरोपपत्र दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील हडपसर भागात प्रवासी युवतीशी अश्लील कृत्य करुन पसार झालेल्या रिक्षाचालकाला पोलिसांनी अटक केली. आराेपी रिक्षाचालकाला अटक केल्यानंतर पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) २४ तासात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

वाघोलीत अफू विक्री करणारा गजाआड – सविस्तर बातमी  

शैलेश गुंडराव पाटील (वय २९, रा. मांजरी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार पीडित युवती अल्पवयीन आहे. ती गुरुवारी (९ ऑक्टोबर) हडपसरमधील माळवाडी भागातून रिक्षाने निघाली होती. रिक्षा प्रवासात आरोपी रिक्षा चालक पाटील याने युवतीशी अश्लील कृत्य केले. या घटनेनंतर घाबरलेल्या युवतीने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी त्वरीत ‘पोक्सो’ कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

हडपसर भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी तपासले. त्याआधारे पोलिसांनी तपास करुन पसार झालेला रिक्षाचालक पाटील याचा माग काढला. पाटीलला अटक करण्यात आली. साक्षीदारांचे जबाब, तसेच पुरावे संकलित करुन पोलिसांनी रिक्षा चालक पाटील याच्याविरुद्ध २४ तासाच्या आत आरोपपत्र दाखल केले. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे निरीक्षक नीलेश जगदाळे, सहायक निरीक्षक हसीना शिकलगार, उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, संदीप राठोड, अमित साखरे, बापू लोणकर, अभिजित राऊत, कुंडलिक केसकर, मीरा रंधवे, साधना राठोड, पूनम खामकर यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×