Breking News
पुण्यातील पोलिस हवालदार गणेश जगतापला आंध्रप्रदेशातून अटकबाबा हरनाम सिंघ जी यांच्या हस्ते आरम्भता की ‘अरदास’ संपन्नपुण्यात १५ वर्षीय मुलीने बाळाला जन्म दिला; स्वतःच कापली नाळराज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणारपरीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवातदिल्ली स्फोटचे पुणे कनेक्शनचा कॉल; तपासात सत्य वेगळेचवेश्या व्यवसायाचे रॅकेट चालविणारा दलालावर एमपीडीएची कारवाईधर्म, मानवता व स्वातंत्र्याचे प्रतीक श्री गुरु तेगबहादुर साहिब जी !जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते बारामती विधानसभा मतदार संघाकरिता प्रारूप मतदार यादी प्रसिद्धमहिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मोटारीतून एक लाखांचा ऐवज चोरीला

मोटारीतील पावणेदोन लाखांची रोकड चोरीला

विमाननगरमधील वुई इडलीवाले परिसरात घडली घटना

marathinews24.com

पुणे – मोटारीची उघडी काच राहिल्याची संधी साधून चोरट्याने ४० हजारांची रोकड आणि इतर वस्तू असा १ लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना १२ जानेवारीला दुपारी सव्वा बाराच्या सुमारास विमाननगरमधील वुई इडलीवाले परिसरात घडली आहे. याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमधील तरूणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तहसीलसमोर लांडगे कुटुंबीयांचा आत्महदहनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण मूळचे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज गावचे आहेत. १२ जानेवारीला ते कामानिमित्त मोटारीतून विमाननगर परिसरात आले होते. त्यावेळी त्यांच्याकडून मोटारीची काच उघडी राहिली होती. नेमकी तीच संधी साधून चोरट्यांनी गाडीतील ४० हजारांची रोकड आणि इतर ऐवज असा १ लाख १ हजारांचा ऐवज चोरून नेला. दरम्यान, काही वेळानंतर माघारी आल्यानंतर तरूणाला गाडीतील रोकड दिसून आली नाही. चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अशोक शिरसाठ तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×