बँक खात्यातून ८ लाख रुपये परस्पर वर्ग करून सायबर चोरट्यांची फसवणूक
marathinews24.com
पुणे – Online Fraud : इलेक्शन कमीशन ऑफ इंडियाच्या कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने जेष्ठाला संपर्क साधला. त्यांचे नाव एसआयआरमध्ये समाविष्ट करण्यासाठी जुळत नसल्याचे सांगून त्यांना लिंक पाठवली. त्यानंतर तक्रारदाराने लिंक उघडताच सायबर चोरट्याने मोबाईल चा ताबा घेउन बँकखात्यातील ८ लाख रुपये वर्ग करुन घेत फसवणूक केली आहे. ही घटना १ ते ३ ऑक्टोबरला घोरपडीत घडली आहे. याप्रकरणी ७४ वर्षीय जेष्ठाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
येरवडा मेट्रो स्थानक परिसरात तरुणाचा मोबाइल हिसकावला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जेष्ठ नागरिक असून, घोरपडीत राहायला आहेत. १ ऑक्टोबरला सायबर चोरट्याने त्यांना संपर्क साधून इलेक्शन कमीशन ऑफ इंडियाच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. एसआयआरमध्ये नाव जुळत नसल्याचे सांगून त्यांना मोबाईल वर लिंक पाठवली. Online Fraud त्यानंतर तक्रारदाराने लिंक उघडताच सायबर चोरट्याने त्यांच्या मोबाइलचा ताबा घेतला. बँक खात्यातील ८ लाख रुपये वर्ग करुन घेतले. तक्रारदाराला बँक खात्यातील रक्कम कमी झाल्याचा मेसेज आला. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक राउत तपास करीत आहेत.
क्रेडिट कार्डच्या बतावणीने ८ लाखांची फसवणूक
क्रेडिट कार्ड तयार करून देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने जेष्ठ नागरिकाला ७ लाख ८० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ७ ऑक्टोबर २०२६ कालावधीत विश्रांतवाडीत घडली आहे. याप्रकरणी ७४ वर्षीय व्यक्तीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सायबर चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक विश्रांतवाडीत राहायला असून, ७ ऑक्टोबरला सायबर चोरट्याने त्यांना व्हॉटसअॅपद्वारे मेसेज पाठवला. क्रेडीट कार्ड तयार करुन देण्याची बतावणी करीत त्यांचाा विश्वास संपादित केला. त्यानंतर त्यांच्याकडून क्रेडिट कार्ड आणि बँक खात्याशी माहिती मिळवली. विविध खात्यांवर ७ लाख ८० हजार रुपये वर्ग करण्यास भाग पाडले. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक राउत तपास करीत आहेत.






















