Breking News
Maharashtra Exam Paper Leak Law : भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादरDagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

Pandharpur Wari Documentary : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारातून तयार झालेल्या ‘वारी’वरील माहितीपटाचा जागतिक स्तरावर सन्मान

Pandharpur Wari Documentary

पंढरपूर वारी- इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ माहितीपटाला आंतरराष्ट्रीय बहुमान

marathinews24.com

मुंबई – Pandharpur Wari Documentary : पंढरपूर आषाढी वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत निर्मिती करण्यात आलेल्या ‘पंढरपूर वारी – इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ या माहितीपटाची प्रतिष्ठित ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स 2026’मध्ये ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ श्रेणीत भारताचा राष्ट्रीय विजेता म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे हे जागतिक पटलावर उमटलेले प्रतिबिंबच आहे.

मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार पुणे नवरात्रौ महोत्सवाचे उद्घाटन – सविस्तर बातमी 

महाराष्ट्राचे वैभव असलेली पंढरपूर वारीची भक्तिमार्गातली समृद्ध परंपरा जगासमोर आणण्याच्या उद्देशाने या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली. माहिती व जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कवरी यांच्यामार्फत निर्मित या माहितीपटाचे डिस्कवरीच्या जगभरातील विविध वाहिन्यांवरुन प्रसारण करण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा, वारकरी संप्रदायाचा आणि शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पंढरपूर वारीचा जागतिक प्रेक्षकांना परिचय करून देण्यासाठी 22 मिनिटांचा इंग्रजी भाषेतील माहितीपट तयार करण्यात आला आहे. Pandharpur Wari Documentary संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांनी दिलेला भक्ती, समता, मानवता आणि बंधुभावाचा संदेश भाषेच्या मर्यादा ओलांडून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचविण्याच्या दृष्टीने हा माहितीपट महत्त्वपूर्ण ठरला आहे.

वारीच्या गौरवशाली परंपरेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुमान-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंढरपूर वारी ही भक्तीमार्गातील अतिशय प्राचीन परंपरा असून ती जात, धर्म, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद न करता सर्वांना विठुरायाच्या रंगात रंगवून एकत्र आणते. ही महान परंपरा, तिचे उद्दिष्ट आणि विचार जगभरात पोहोचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत ‘पंढरपूर वारी – इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ ही सुंदर डॉक्युमेंट्री तयार करून रिलीज करण्यात आली आहे. या डॉक्युमेंट्रीला ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स 2026 मध्ये भारत देशासाठीचा ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. यासाठी माहिती व जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांचे मी अभिनंदन करतो. वारीची गौरवशाली परंपरा जगासमोर मांडणारी माहितीपट सर्वांनी पाहावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

वारीची सांस्कृतिक परंपरा आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह म्हणाले की, आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील विविध देशांमधून सादर झालेल्या दर्जेदार निर्मितींमधून या माहितीपटाची भारताचा राष्ट्रीय विजेता म्हणून निवड झाली. या बहुमानामुळे महाराष्ट्राची भक्तीपरंपरा, संतसाहित्य, सामाजिक समतेचा संदेश आणि वारीची वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक परंपरा आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×