Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

घरफोडी करणारा परप्रांतीय चोरटा गजाआड

घरफोडी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

Marathinews24

पुणे – घरफोडी करुन पसार झालेल्या कर्नाटकातील चोरट्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून दुचाकी,कटावणी, कटर, पाना असा मुद्देमाल जप्त केला. व्यंकटेश रमेश व्यंकी (वय २२, रा. गांधीनगर, चल्लाकेरे, जि. चित्रदुर्ग, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. व्यंकी हा मूळचा कर्नाटकातील आहे. तो परराज्यातून दुचाकीवर येऊन घरफोडीचे गुन्हे करत होता.

वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर चित्ते आणि गणेश शिंदे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने कर्वेनगर भागात सापळा लावला. पोलिसांनी व्यंकीला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली. दुचाकीची डिकी पोलिसांनी उघडली. डिकीत कटर, कटावणी, पाना, स्क्रु ड्रायव्हर सापडले. पोलिसांनी व्यंकी याची चौकशी केली. चौकशीत त्याने लोणीकंद, आंबेगाव, बावधन परिसरात घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती मिळाली. त्याच्याकडे असलेली दुचाकी त्याने हडपसर भागातून चोरल्याचे उघड झाले आहे.
परिमंडळ तीनचे पाेलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस कर्मचारी वाकसे, कळंबे, चित्ते, शिंदे, पोळ, कुंभार, काटे, तांगडे, कपाटे, जाधव, शेलार यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×