Breking News
Sahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यूPune Public Drinking Assault Case : दारु पिण्यास मनाई केल्याने तिघांना मारहाणpune molestation case : महिलेचा विनयभंग; पुण्यात माजी पोलीस अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल14 Women Sexual Exploitation Case : धक्कादायक….लग्नाच्या आमिषाने तब्बल १४ महिलांचे लैंगिक शोषणSTEP Skill Training Maharashtra : अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचे ‘संत रोहिदास अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रम कार्यक्रम’ असे नामकरण : मंत्री मंगल प्रभात लोढाMission Lakshvedh Maharashtra : ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांचा आढावाAmitesh Kumar Pune : तर बंदोबस्तासाठी १०० अमलदार देतो – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Pratap Asbe Death News : ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचे निधन

Pratap Asbe Journalist Tribute

राजकीय घडामोडींचा जाणकार विश्लेषक गमावला

marathinews24.com

मुंबई – Pratap Asbe Death News : राजकीय आणि सामाजिक घडामोडींचे अभ्यासू विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांचे आज संध्याकाळी अल्पशा आजाराने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय पत्रकारितेतील एक निर्भीड, सडेतोड आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. पत्रकारितेसोबतच कामगार चळवळ आणि सामाजिक संघर्षांमध्येही त्यांनी मोलाचे योगदान दिले.

घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; दोघांना अटक – सविस्तर बातमी 

प्रताप आसबे हे युवक क्रांतिदल आणि गिरणी कामगार सभा यांचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते. कामगार तसेच असंघटित शेतमजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक संघर्षांमध्ये अग्रभागी राहून सहभाग घेतला. सामाजिक न्यायाच्या लढ्यात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावे, यासाठी झालेल्या नामांतराच्या चळवळीतही त्यांनी सहभाग घेतला होता. आंदोलनादरम्यान त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला.

‘महाराष्ट्र देशी’तून राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण

सामाजिक चळवळीतील सक्रिय सहभागानंतर प्रताप आसबे यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला. ‘नवशक्ती’ या वृत्तपत्रातून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर प्रदीर्घ काळ ‘महाराष्ट्र टाइम्स’ या दैनिकातून त्यांनी राजकीय आणि सामाजिक विषयांवर अभ्यासपूर्ण लेखन केले. (Pratap Asbe Death News) त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये म्हणजे विषयाचा सखोल अभ्यास, राजकीय घडामोडींकडे पाहण्याचा चिकित्सक दृष्टिकोन आणि निर्भीडपणे मांडलेली मते. ‘महाराष्ट्र देशी’ हे त्यांचे सदर राज्यातील राजकीय घडामोडी, सत्ताकारण आणि सामाजिक वास्तव यांचे प्रभावी प्रतिबिंब मानले जात असे. त्यांच्या लेखनातून महाराष्ट्राच्या राजकारणाचा वेध घेताना अनेक महत्त्वाच्या घडामोडींचे विश्लेषण वाचकांसमोर येत असे.

पत्रकारिता आणि सामाजिक चळवळींसोबतच प्रताप आसबे यांचे सांस्कृतिक क्षेत्राशीही जवळचे नाते होते. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे ते विश्वस्त म्हणून कार्यरत होते. सामाजिक प्रश्नांबाबतची जाणीव, लोकशाही मूल्यांवरील निष्ठा आणि सार्वजनिक जीवनातील घडामोडींचा अभ्यास या गुणांमुळे त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आदराचे स्थान मिळवले. प्रताप आसबे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन गुरुवारी सकाळी ८.३० ते १०.३० या वेळेत वांद्रे पूर्व येथील त्यांच्या निवासस्थानी घेता येईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

प्रताप आसबे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय पत्रकारितेतील अभ्यासू विश्लेषक, सामाजिक बांधिलकी जपणारा पत्रकार आणि कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा कार्यकर्ता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×