Breking News
Kharadi Bypass Robbery Case : पादचारी जेष्ठेच्या अंगावर पाणी उडवून लुटलेLost Mobile Recovery : वाघोली पोलिसांनी तक्रादारांच्या चेहर्‍यावर फुलवले हसूPune Crime News : पुण्यात पार्किंगच्या वादातून हाणामारीच्या घटनाBopdev Ghat Car Accident : बोपदेव घाटात वाहनाच्या धडकेत मोटार दरीत कोसळलीSugarcane Transport Safety Rules : साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीसाठी आरटीओचे सुरक्षा नियमPune Election 2026 : पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी मतदान साहित्य घेऊन पथके मतदान केंद्रांकडे रवानाPune Crime News : खुनाच्या प्रयत्नात ५ वर्षांपासून फरार आरोपीला बेड्याPune Domestic Harassment Cases : कौटुंबिक छळामुळे पुण्यात दोन महिलांनी केली आत्महत्याSeva Sankalp Abhiyan : ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध जनजागृतीपर उपक्रमDeposit Fraud : छत्रपती मल्टीस्टेट सोसायटी प्रकरण; ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन

Pune Crime : जागा नावावर करण्यासाठी ७७ वर्षीय आजोबांना मारहाण

Pune Crime

घरातील वस्तूंची तोडफोड

marathinews24.com

पुणे – Pune Crime : जागा नावावर करण्याची मागणी करत ७७ वर्षीय आजोबांना नातवाने लोखंडी रॉड आणि बांबूने मारहाण केल्याची घटना थेऊर येथे घडली. सुनेनेही मारहाण केल्याचा, तसेच घरातील वस्तूंचे नुकसान केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तेजस आशीष भापकर (वय २३, रा. बोरीआयंदी, ता. दौंड) आणि मंगल आशीष भापकर (वय ४५, रा. चिंतामणी गणपती मंदिराजवळ, थेऊर, ता. हवेली) यांच्यावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात विद्यानंद बापट यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज – सविस्तर बातमी

वामन गेणबा भापकर (वय ७७, रा. चिंतामणी गणपती मंदिराजवळ, थेऊर) यांनी फिर्याद दिली. दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास फिर्यादी यांच्या घरी घटना घडली. तेजसने संपूर्ण जागा आपल्या नावावर करण्याची मागणी केली. ती मान्य न केल्यास जिवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. त्यानंतर रॉड आणि बांबूने मारहाण केली. त्यांच्या हाताच्या दंडाला चावा घेऊन लाथाबुक्क्यांनीही मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मंगल हिनेही शिवीगाळ करून हाताने व बुक्क्यांनी मारहाण केली. घरातील खुर्ची, टेबल, गॅस शेगडीसह अन्य वस्तूंचे नुकसान करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही आरोपींना अटक झालेली नाही. पोलिस हवालदार बारगजे तपास करीत आहेत.

एस. एम. जोशी कॉलेजच्या पार्किंगमध्ये विद्यार्थ्याला मारहाण

पूर्वीच्‍या असेलेल्‍या शुल्‍लक वादातून हडपसरमधील एस. एम. जोशी कॉलेजच्या पार्किंगमध्ये १७ वर्षीय विद्यार्थ्याला दगडाने व हाताने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी चौघांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा Pune Crime दाखल झाला आहे. चार जणांवर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्निल प्रवीण जाधव (वय १७, रा. साडे सतरानळी, हडपसर) याने फिर्याद दिली. दि. २९ सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास कॉलेजच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली. आरोपींनी स्वप्निलला त्याचा भाऊ तुषार जाधव याला बोलावण्यास सांगितले. त्यानंतर त्याच्यावर दगडाने आणि हाताने हल्ला केला. स्वतःचा बचाव करत असताना त्याच्या उजव्या कानामागे दगड लागून दुखापत झाली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×