धार्मिक भावना दुखाविल्या प्रकरणी कारवाईची मागणी
marathinews24.com
पुणे – शहरात ध्वनी प्रदूषणाबाबत भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांनी धार्मिक भावना दुखाविल्या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नगरसेवक गणेश कल्याणकर यांनी केली आहे. कल्याणकर यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. बापट यांनी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्ते, तसेच धार्मिक सण, उत्सवांवर टीका केली. (Vidyānand Bapat) यांचे वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारे आहे, तसेच धार्मिक भावना दुखाविणारे आहे. बापट यांच्या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखाविल्या असून, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी कल्याणकर यांनी केली आहे.
बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली – सविस्तर बातमी
Vidyānand Bapat कल्याणकर यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. ‘बापट यांनी विसर्जन मिरवणूक पार पडल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना कार्यकर्त्यांवर टीका केली. बापट यांच्या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखाविल्या आहेत. कार्यकर्तो म्हणून मी पोलिसांकडे योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत तक्रार अर्ज दिला आहे’, असे कल्याणकर यांनी नमूद केले. दरम्यान, कार्यकर्ते राहुल देखणे यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. धार्मिक भावना दुखाविल्या प्रकरणी बापट यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.






















