बाणेर पोलिसांची कारवाई
marathinews24.com
पुणे – पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला पोलिसांनी बालेवाडीतील हायस्ट्रीट परिसरात पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, दोन काडतुसे जप्त करण्यात आली.आदित्य दशरथ ओैचरे (वय २२, रा. शिवनेरी पार्क, बालेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. बालेवाडीतील हायस्ट्रीट परिसरातील मोकळ्या जागेत ओैचरे थांबला असून, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी गणेश भोईने यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून ओैचरे याला पकडले.
जबाबविना पोलीस पथक परतले? उद्योजक राणा सूर्यवंशी यांना रुग्णालयातुन डिस्चार्ज – सविस्तर बातमी
त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतुसे सापडली. ओैचरे याने पिस्तूल का बाळगले ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला, सहायक आयुक्त ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खिल्लारे, सहायक निरीक्षक अनिल केकाण, गणेश रायकर, गणेश गायकवाड, बाबा आहेर, किसन शिंगे, संदेश निकाळजे, संजय दहिभाते यांनी ही कारवाई केली.
























